प्रोटीनसाठी ड्रायफ्रूट्स नाही तर रोज खा फक्त मूठभर शेंगदाणे
मानवी शरीरासाठी प्रोटीन हा घटक अत्यंत महत्वाचा मानला जातो. पण तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की सगळ्यांच्या घरात आढळणाऱ्या या गोष्टीमुळे भरपूर प्रोटीन मिळते. शरीराला भरपूर मिळण्यासाठी काजू-बदाम किंवा कोणताही सुका मेवा खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हे ड्रायफ्रूट्स (Dry fruits) किमतीने फार महाग असतात. त्यामुळे नेहमीच विकत घेणं परवडेलच असं नाही. पण काजू-बदामपेक्षाही असा एक स्वस्त सुकामेवा आहे जो सर्वांना परवडणारा तसेच भरपूर प्रोटीन असणारा हा सुकामेवा प्रत्येकाला परवडणारा आणि शरीराला फायदा देणारा आहे.गरिबांचे बदाम म्हणून ओळखले जाणारे शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवतात आणि मेंदूचे कार्य सुधारतात. रोज १०० ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यानं स्मरणशक्ती चांगली राहते. शेंगदाण्यांमध्ये ओमेगा-६ फॅटी एसिड्स असतात ज्यामुळे मेंदूच्या नसा मजबूत होण्यास मदत होते. रोज १०० ग्रॅम शेंगदाण्यांचे सेवन केल्यास तुम्हाला प्रोटीन, ओमेगा-३ आणि ओमेगा ६ फॅटी एसिड, फायबर्स, व्हिटामीन, खनिजं यांसारखी पोषक तत्व मिळतील.
शेंगदाणे (Peanuts) प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो त्याची कारणं खालीलप्रमाणे आहेत. १०० ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये अंदाजे २५ ग्रॅम पेक्षा जास्त प्रथिनं असतात. हे प्रमाण अनेक मांसाहारी पदार्थांपेक्षा किंवा इतर महागड्या सुक्या मेव्यांपेक्षा जास्त आहे. शेंगदाणे वनस्पती आधारीत प्रथिनांचा एक स्वस्त आणि उत्तम पर्याय आहेत. विशेषत:शाकाहारी आणि व्हिगन आहार घेणाऱ्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे.प्रथिनं शरीरातील स्नायू तयार करण्यासाठी आणि त्यांची दुरूस्ती करण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे शेंगदाणे व्यायाम करणाऱ्यांसाठी आणि वाढत्या वयाच्या मुलांसाठी खूप फायदेशीर आहेत. प्रथिनांमुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही तसंच वजन नियंत्रणात राहतं.
शेंगदाण्यामध्ये ‘मोनोअनसॅचुरेटेड’ आणि ‘पॉलीअनसॅचुरेटेड’ फॅटी ॲसिडस् आढळतात. हे घटक शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करून चांगले कोलेस्टेरॉल वाढवतात. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हार्ट ब्लॉकेजचा धोका कमी होतो. तसेच, त्यात असलेले अँटिऑक्सिडंट ‘रेसवेराट्रॉल’ हृदयाला मजबूत बनवते.काही लोकांना वाटते की, शेंगदाणे खाल्ल्याने वजन वाढते, पण हे खरे नाही. शेंगदाण्यातील फायबर आणि प्रोटीन पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात, ज्यामुळे जास्त खाणे टळते. अशा प्रकारे शेंगदाणे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि चयापचय क्रिया सक्रिय ठेवतात.शेंगदाण्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि झिंक त्वचेला चमकदार बनवतात आणि केसांना मजबूत करतात. हे घटक एजिंग (Aging) प्रक्रिया कमी करतात आणि त्वचेला आतून हायड्रेट ठेवतात. शेंगदाण्याचे तेल उत्तम मॉइश्चरायझर म्हणून केस आणि त्वचेसाठी वापरले जाऊ शकते.मधुमेहाच्या रुग्णांसाठीही शेंगदाणे एक आरोग्यदायी स्नॅक आहे. शेंगदाण्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, ज्यामुळे ते रक्तातील साखर वेगाने वाढू देत नाही. मात्र, मधुमेही लोकांनीही शेंगदाणे मर्यादेतच खाणे योग्य आहे.




