spot_img

Yogita Chavan Saurabh Choughule : मराठी मालिकेतील या लाडक्या कपलचा होणार घटस्फोट ?

spot_img

अभिनेत्री योगिता चव्हाण-सौरक्ष चौघुले वेगळे होणार? 

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘जीव माझा गुंतला’. याच मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंतरा-मल्हार जोडी सुपरहिट झाली. या मालिकेनंतर अंतरा-मल्हार म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले वास्तवात आयुष्यभराचे जीवनसाथी झाले. ३ मार्च २०२४ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.मात्र आता दोघेही विभक्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे. हे जोडपं कुठेच एकत्र दिसत नाही. तसेच, दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं असून लग्नाचे फोटोही डिलिट केले आहेत. इंडस्ट्रीत घटस्फोट (Divorce Trend) घेण्याचा ट्रेंड सुरू आहे, असं म्हटलं तरीसुद्धा वावगं ठरणार नाही. एकापाठोपाठ एक अशी जोडपी वेगळी होत आहे. सुखी संसाराच्या कित्येक वर्षांनी अनेकांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि सौरभ चौघुले (Saurabh Chaughule) यांच्या एकत्र पोस्ट पाहायला मिळत नाहीत. तसेच, दोघांनी दिवाळीतही एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले नाहीत. याव्यतिरिक्त त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आले आहेत. योगितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोघांचे फोटो डिलिट केल्याचं पाहायला मिळत आहे. योगिताच्या अकाऊंटवर तिचे सौरभसोबतचे फोटो दिसत नाहीयेत. दोघांच्या नात्यात खरंत दुरावा आलाय की, तिनं आणखी दुसऱ्या कोणत्या कारणांमुळं हे फोटो डिलिट करण्याचा निर्णय घेतला, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ