Adarsh Baal Vidyalaya : ओटीटीवर ‘आदर्श बाल विद्यालय’ वेब सीरिजचा बोलबाला; रिलीज होताच पटकावले पहिले स्थान

spot_img

के. के. मेननच्या दमदार अभिनयाने सजलेली शाळा आणि शिक्षणावरील ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस, मिळाले घसघशीत रेटिंग.

सध्या देशभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू असतानाच, प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली ‘आदर्श बाल विद्यालय’ ही नवी वेब सीरिज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सात भागांची ही सीरिज रिलीज होण्यासोबतच नंबर-वन ट्रेंडिंगमध्ये आली आहे. दिल्लीतील एका सरकारी शाळेच्या पार्श्वभूमीवर बेतला गेलेली ही कथा, तेथील बेशिस्त विद्यार्थी आणि दहावीच्या चांगल्या निकालावर शिक्षकाला मिळणारी केंब्रिज वारी या भन्नाट कल्पनेभोवती फिरते. के. के. मेनन यांच्या प्रमुख भूमिकेसह नवीन कस्तुरिया, अर्चना पुरण सिंह आणि इतर कलाकारांच्या अभिनय शैलीने या सीरिजला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. प्रत्येक भागात हाताळले जाणारे वास्तववादी आणि गंभीर विषय यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, आयएमडीबीवर या सीरिजला १० पैकी ८.३ एवढे उत्कृष्ट रेटिंग मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ