Dadar Shivaji Park Protest : दादरच्या शिवाजी पार्कातील विनापरवानगी सभेनंतर ‘ठाकरे गटा’च्या आयोजकांवर गुन्हे दाखल!

spot_img

मैदान रिकामे न केल्याने दंगल नियंत्रण पथक पाचारण; दादर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, तीन स्वतंत्र गुन्हे दाखल मात्र अद्याप अटक नाही

मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काल आयोजित केलेल्या जाहीर सभेनंतर आता पोलिसांकडून मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान शिवसैनिक, सभेचे आयोजक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. सभा संपल्यानंतरही आंदोलक आणि विद्यार्थी मैदान सोडायला तयार नव्हते, ज्यामुळे दादर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही सभा प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीरपणे आयोजित करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर, शिवाजी पार्क पोलिसांनी सभेच्या आयोजकांविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अत्यंत कडक पावले उचलत ठाकरे गटाच्या आयोजकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. विनापरवानगी बेकायदेशीरपणे सभेचे आयोजन केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभेला परवानगी नसतानाही सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून लोकांना आणि विद्यार्थ्यांना शिवाजी पार्कात जमा होण्याचे आवाहन केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा नोंदवला गेला आहे. तसेच, सभा संपल्यानंतरही आंदोलक विद्यार्थ्यांनी दादरच्या विविध रस्त्यांवर उतरून निदर्शने सुरूच ठेवल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचवल्याप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसली, तरी पोलिसांचा तपास सुरू आहे.

काल झालेल्या या सभेला आंदोलक आणि शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती, ज्यामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली. आंदोलकांनी मैदान रिकामे करावे म्हणून पोलीस वारंवार आवाहन करत होते, मात्र गर्दी मागे हटायला तयार नव्हती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून शेवटी खबरदारीचा उपाय म्हणून ‘दंगल नियंत्रण पथकाला’ (RCP) देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.

या गदारोळापूर्वी शिवाजी पार्कातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर अत्यंत कडक शब्दांत हल्लाबोल केला. “जर तुमचे सरकार पाकिस्तानशी चर्चा करू शकते, तर मग देशासाठी लढणाऱ्या सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करायला तुम्हाला काय अडचण आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही वृत्तीवर जोरदार टीका केली. सध्या दादर आणि शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ