spot_img

Govardhan Asrani Passed Away : जेष्ठ अभिनेते असराणी काळाच्या पडद्याआड !

spot_img

वयाच्या 84 व्या वर्षी असराणी यांनी घेतला शेवटचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी कलाकार असरानी यांते निधन झाले आहे. सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. सोमवारी दुपारी 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. असरानी यांचा जन्म 1 जानेवारी 1941 रोजी जयपूरमध्ये झाला. जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. 1967 मध्ये ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. गोवर्धन असरानी यांनी आपल्या कारकिर्दीत 300 पेक्षा जास्त हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले. मात्र बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवने त्यांच्यासाठी सोपे काम नव्हते.बॉलीवूडमध्ये काम न मिळाल्याने असरानी हे दक्षिणेकडे वळले. त्यांना तिथे काम मिळाले. त्यांना दक्षिण भारतातील प्रमुख अभिनेते आणि दिग्दर्शकांसोबत काम केले. त्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये संधी मिळू लागली. बी.आर. चोप्रा यांनी त्यांना निकाह चित्रपटात काम दिले. लोकांनी सांगितले की ते या भूमिकेसाठी योग्य नाहीत, मात्र तरीही चोप्रा यांनी संधी दिली आणि नंतर चित्रपट हिट झाला.

असराणी यांनी ‘आज की ताजा खबर’ (1974) आणि ‘बालिका वधू’ (1977) साठी दोनदा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. ते राजेश खन्ना यांचे जवळचे मित्र होते. १९७२ ते १९९१ दरम्यान त्यांनी २५ हून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.असराणी यांनी १९७४ ते १९९७ दरम्यान सहा चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. त्यापैकी एक गुजराती चित्रपट होता, ज्यात त्यांच्यावर प्रसिद्ध ‘हूं अमदावाद नो रिक्षावाળો’ हे गाणे चित्रित झाले होते.

घरातून पळून मुंबई गाठली, ऑल इंडिया रेडिओमध्येही काम केले

असराणी यांनी घरातून पळून जाऊन बॉलिवूडमध्ये करिअर सुरू केले, कारण त्यांच्या कुटुंबाला त्यांनी सरकारी नोकरी करावी असे वाटत होते. त्यांनी सेंट झेवियर्स शाळेतून शिक्षण घेतले आणि जयपूरच्या राजस्थान कॉलेजमधून पदवी मिळवली. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये व्हॉईस आर्टिस्ट म्हणूनही काम केले.

शूटिंगदरम्यान झाले प्रेम, अभिनेत्री मंजू बन्सल यांच्याशी लग्न

चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री मंजू बन्सल यांच्यासोबत त्यांचे प्रेम जुळले. दोघांनी ‘नमक हराम’, ‘तपस्या’ आणि ‘आज की ताजा खबर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ