Vinayak Raut : “हिंमत असेल तर सांगा सासरी काय आणलं अन् जाताना काय नेलं? विनायक राऊतांचे सुनेला थेट आव्हान!”

spot_img

विनायक राऊतांचा पलटवार; “१० कोटींच्या मागणीसाठीच सुनेचे खोटे आरोप”

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या घरातील कौटुंबिक वाद आता थेट पोलीस ठाण्यात आणि प्रसारमाध्यमांसमोर आला आहे. विनायक राऊत यांचे सुपुत्र गितेश राऊत यांच्या पत्नी गिरीजा राऊत यांनी पतीसह सासरच्या ७ लोकांवर शारीरिक संबंध आणि कौटुंबिक छळाचे गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असतानाच, आता विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सुनेचे सर्व आरोप फेटाळले असून तिच्यावरच खळबळजनक दावे केले आहेत.

“जर तिच्यासोबत गैरप्रकार होत होता, तर ती आणि तिचे सुजाण आई-वडील इतके दिवस गप्प का राहिले? त्यांनी तेव्हाच पोलिसांत धाव का घेतली नाही?” विनायक राऊत यांनी सांगितले की, सुनेच्या मागण्या सातत्याने वाढत होत्या. सुरुवातीला तिने २ बेडरूमचा फ्लॅट मागितला, त्यानंतर २ कोटींवरून ५ कोटी आणि आता थेट १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. “तिला ३ बेडरूमचा मोठा फ्लॅट हवा आहे आणि त्याचा ईएमआय (EMI) देखील आम्हीच भरावा, अशी तिची अट आहे. या अवाजवी मागण्या पूर्ण करण्यासाठीच तिने हे खोटे आरोप रचले आहेत,” असा दावा राऊतांनी केला. गिरीजा स्वतःच्या मर्जीने माहेरी गेली असून जाताना घरातून तब्बल १३ बॅगा भरून स्वतःचे सर्व स्त्रीधन घेऊन गेली आहे. तिच्यात हिंमत असेल तर तिने सासरी किती आणले आणि जाताना किती नेले, हे जाहीर करावे, असे आव्हान राऊतांनी दिले. “आम्ही अध्यात्मिक आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार मानणारे लोक आहोत. कुलदेवतेच्या दर्शनाला गावाला जाणे हा काही गुन्हा नाही. आम्ही अशा खोट्या आरोपांना बिलकुल भीक घालत नाही,” असे सांगत त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ