Bengaluru Crime : बंगळुरू हादरलं! नकार देऊनही डिलिव्हरी बॉय बळजबरीने घरात घुसला; वॉशरुम वापरून महिलेसमोर केलं अश्लील कृत्य, VIDEO व्हायरल!

spot_img

“त्या कठीण प्रसंगात मी हिंमत दाखवून मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेवला”; पीडित महिलेने सोशल मीडियावर मांडली आपबिती, नराधमावर कठोर कारवाईची मागणी.

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका पार्सल डिलिव्हरी बॉयने घरात घुसून अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक आरोप एका महिलेने केला असून, या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ माजली आहे. पीडित महिलेने या संपूर्ण संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत न्याय मागितला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमधून संबंधित डिलिव्हरी बॉयवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पीडित महिलेने सोशल मीडियावर आपल्यासोबत घडलेला भयानक प्रसंग सांगताना म्हटले की, तो डिलिव्हरी बॉय तिच्या घरी एक पार्सल देण्यासाठी आला होता. पार्सल सुपूर्द केल्यानंतर त्याने महिलेकडे वॉशरुम (शौचालय) वापरण्याची परवानगी मागितली. अनोळखी व्यक्ती असल्याने महिलेने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. शेजारी राहणाऱ्या इतर पुरुषांकडे मदत मागण्याचा पर्याय असतानाही, त्या डिलिव्हरी बॉयने महिलेच्या नकाराला पूर्णपणे डावलले. तो घराबाहेर चप्पल काढून बळजबरीने घरात घुसला आणि थेट शौचालयात गेला.

महिलेने पुढे केलेले आरोप अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहेत. ती म्हणाली, “शौचालयातून बाहेर आल्यानंतर त्या नराधमाने माझ्यासमोर त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवून अत्यंत अश्लील कृत्य केले. त्या कृत्याने मी प्रचंड घाबरले आणि मला माझ्याच हक्काच्या घरात असुरक्षित तसेच अत्यंत अपमानित वाटू लागले. कोणत्याही पुरुषाला एका महिलेच्या घरात तिच्या परवानगीशिवाय असे बळजबरीने घुसण्याचा अधिकार नाही.”

या अत्यंत भीतीदायक आणि कठीण प्रसंगातही महिलेने कमालीचे धैर्य दाखवले. तिने प्रसंगावधान राखत आपल्या मोबाईलचा कॅमेरा सुरू केला आणि संपूर्ण प्रकार रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी ती घराच्या मुख्य दरवाजाजवळ उभी राहिली, जेणेकरून त्याने हल्ला किंवा गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास ओरडून बाहेर पळता येईल. या घटनेने सदर महिला मानसिक धक्क्यात असून, इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस या विकृत डिलिव्हरी बॉयचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ