Nita Ambani : फॉर्च्यून इंडियाच्या ‘मोस्ट पॉवरफुल वुमन 2026’ यादीत नीता अंबानी अव्वल; विविध क्षेत्रातील 100 महिलांचा गौरव

spot_img

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या फॉर्च्यून इंडियाच्या ‘मोस्ट पॉवरफुल वुमन 2026’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला नेत्यांचा गौरव करण्यात आला. मुंबईतील फोर सीजन्स हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्यात उद्योग, वित्त, तंत्रज्ञान, आरोग्य, सार्वजनिक धोरण आणि उद्योजकता क्षेत्रातील अग्रगण्य महिलांची उपस्थिती होती. यावेळी फॉर्च्यून इंडियाने 2026 सालातील सर्वाधिक प्रभावशाली 100 महिलांची यादी जाहीर केली. या यादीत रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी प्रथम क्रमांक पटकावत देशातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून मानाचा बहुमान मिळवला. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकासासाठी त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर नीता अंबानी यांनी नेतृत्वाची खरी ताकद केवळ यशात नसून करुणा, सर्वसमावेशकता आणि इतरांना संधी देण्याच्या दृष्टिकोनात असल्याचे सांगितले. त्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलींच्या शिक्षणात आणि त्यांच्या सर्वांगीण विकासात सातत्याने गुंतवणूक करणे अत्यंत गरजेचे असल्यावर भर दिला. समाजातील महिलांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या क्षमतेला योग्य व्यासपीठ मिळणे हे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. विविध क्षेत्रांत प्रभावी कामगिरी करणाऱ्या महिलांच्या सन्मानामुळे महिला नेतृत्वाला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच नव्या पिढीतील तरुणींना मोठी प्रेरणा मिळेल, अशी भावना कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ