Ketan Agarwal Murder : लॉकअपमध्येही सिया गोयलचा माज कायम; पश्चातापाऐवजी पोलिसांकडेच केली ‘या’ गोष्टीची मागणी!

spot_img

एका जिवंत माणसाचा बळी घेऊनही आरोपी जोडपे अतिशय सामान्य; पोलिसांचा खाक्या दिसताच प्रेम गायब, आता एकमेकांवरच ढकलत आहेत दोष.

पुण्याजवळील ऐतिहासिक लोहगडावर होणाऱ्या पतीला शेकडो फूट खोल दरीत ढकलून देणारी क्रूर कृत्य करणारी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या कारनाम्यांनी संपूर्ण देश हादरला आहे. अवघ्या २० ते २२ वर्षांच्या या तरुणांनी अत्यंत थंड डोक्याने रचलेला हा ‘मर्डर प्लॅन’ ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा आला आहे. एखाद्या जिवंत व्यक्तीचा जीव घेताना, त्याला काळजाचा थरकाप उडवणाऱ्या कड्यावरून खाली ढकलून देताना यांना काहीच कसं वाटलं नाही, असा संतप्त सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. केतन अग्रवाल या निष्पाप तरुणाच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना, हा क्रूर गुन्हा करणाऱ्या सिया आणि चेतन यांच्या चेहऱ्यावर मात्र पश्चातापाचा लवलेशही उरलेला नाही. २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या या दोघांची कसून चौकशी सुरू आहे, परंतु लॉकअपमधील सियाचे वागणे पाहून पोलीस अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

आपल्या रक्ताच्या नात्यात बांधल्या जाणाऱ्या भावी पतीच्या खुनाचा गंभीर आरोप असूनही सियाच्या चेहऱ्यावर ना कोणती खंत आहे ना भीती. उलट, तिच्या वागण्यात अजूनही श्रीमंतीचा माज आणि उद्दामपणा स्पष्टपणे जाणवत आहे. या सगळ्यात अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, खुनाच्या गुन्ह्याखाली गजाआड असलेल्या सियाने लॉकअपमध्ये थेट पोलिसांकडेच चक्क ‘बीअर’ आणि दारूची मागणी केली. सियाला मद्यपानाची प्रचंड सवय असून कोठडीत असतानाही तिची ही सवय सुटलेली नाही. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जेव्हा तिची ही भलतीच मागणी ऐकली, तेव्हा तेही क्षणभर थक्क झाले. मात्र, पोलिसांनी तात्काळ आपला खाक्या दाखवत तिला कडक शब्दांत खडसावले, ज्यानंतर ती शांत झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन या दोघांनाही सध्या वेगवेगळ्या लॉकअपमध्ये ठेवून त्यांची स्वतंत्र चौकशी केली जात आहे. ज्या प्रेमासाठी आणि लग्नाचा अडसर दूर करण्यासाठी या दोघांनी मिळून केतनचा काटा काढला, पोलिसांची कडक चौकशी सुरू होताच ते प्रेम जणू हवेत विरून गेले आहे. दोघेही आता पोपटासारखे बोलू लागले असून स्वतःला वाचवण्यासाठी एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. चेतनने पोलिसांसमोर असा दावा केला आहे की, त्याला सियासोबत पळून जायचे होते, परंतु कुटुंबाच्या बदनामीच्या भीतीने सियाने पळून जाण्यास नकार दिला आणि केतनची हत्या करण्याचा आग्रह धरला. दुसरीकडे, सियाने हा सर्व आरोप झटकून लावत, केतनला मारण्याची पूर्ण कल्पना आणि प्लॅन एकट्या चेतनचाच होता, असा कांगावा सुरू केला आहे. या संपूर्ण प्रकरणात आपला सहभाग कमीत कमी कसा दिसेल, यासाठी ही दोन्ही नराधम विकृती आता एकमेकांवर दोष ढकलण्यात मग्न आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ