ओतूर,प्रतिनिधी:दि.२५ जून [ रमेश तांबे ]
जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या केबल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून,सदर टोळीकडून १५० शेतकऱ्यांच्या केबल चोरीचे एकूण १२ गुन्हे उघड उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीसांना यश आले आहे.
आरज्या छत्तेसिंग पवार वय १९ रा.कुडे, पोस्ट हरदुआ ता.जिल्हा कटनी, मध्य प्रदेश, गगन शापिलाल चौहान वय १९ रा. येडियाव पोस्ट छनेरा, हरसूल जिल्हा, खंडवा, मध्य प्रदेश, अतुल शापिलाल चौहान वय २१ रा. येडियाव पो. छनेरा, हरसूल जिल्हा, खंडवा, मध्य प्रदेश, तपसलाल सर्कस पवार वय ५० रा.कुडे, पोस्ट हरदुआ ता.जिल्हा कटनी, मध्य प्रदेश, सुरज रामसर आदिवासी वय ४० रा. बुढा देवगाव ता. रेठी जि. कटणी, मध्य प्रदेश अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर हे माहिती देताना म्हणाले की,जुन्नर,आंबेगाव तालुक्यामध्ये मागील काही दिवसात नदीच्या पात्रातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या केबल वायर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या.वारंवार केबल चोरी होत असल्याने शेतकरी हैराण झाले होते.सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदर गुन्हे उघडकीस आणून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शेलार,सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे,अक्षय नवले,अभिमन्यू मोटे यांच्या पथका मार्फत समांतर तपास करत असताना,गुन्हे शाखेच्या पथकाने अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली असता गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की अशा प्रकारचे गुन्हे हे मध्य प्रदेश राज्यातील आरोपी करत असून ते चोरी करण्याच्या ठिकाणच्या आसपास येऊन राहतात व रात्रीच्या वेळी अशा चोऱ्या करतात ज्या वेळी चोऱ्या झाल्या त्या काळात आरोपी जुन्नर तालुक्यात काही भागात फिरस्ते होते सध्या ते नाशिक येथील घोटी इगतपुरी या गावच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने नारायणगाव पोलीस स्टेशन पथकासह घोटी, नाशिक येथे सापळा लाऊन संशयित आरोपी
आरज्या छत्तेसिंग पवार, गगन शापिलाल चौहान, अतुल शापिलाल चौहान ,तपसलाल सर्कस पवार, सुरज रामसर आदिवासी यांना तब्यात घेतले व त्यांच्याकडे सदर गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून जवळपास १५० शेतकऱ्यांच्या केबल जप्त करण्यात आल्या असून केबल चोरीचे जुन्नर, नारायणगाव, ओतूर व पारगाव परिसरातील एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. सर्व आरोपी हे नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्याकडे पोलीस कस्टडीमध्ये असून पुढील तपास व कार्यवाही सुरू आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिप गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे,धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शेलार,सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण सपांगे,सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमिन,संदीप वारे,अक्षय नवले,अभिमन्यू मोटे,सहाय्यक पोलीस फौजदार शरद बांबळे, पोलीस हवालदार अतुल डेरे, संदीप फड, निलेश सुपेकर, स्वप्निल गाढवे नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, टीलेश जाधव, सोमनाथ डोके, आदिनाथ लोखंडे, संतोष कोकणे यांनी केली आहे.




