spot_img

Akshay Kumar Deepfake Video : अभिनेता अक्षय कुमारच्या डीपफेक व्हिडिओवर न्यायालयाचा महत्वाचा निर्णय !

spot_img

सोशल मीडियावरून व्हिडिओ काढून टाकण्याचे न्यायालयाचे आदेश!

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI हा पर्याय सर्वांना सहज उपलब्ध असल्यामुळे त्याचा वापर वाढला आहे.सोशल मीडिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे आज कोणाचाही फोटो किंवा व्हिडीओ सहज एडिट करता येतो. पण या तंत्रज्ञानाचा गैरवापरही वाढला आहे आणि सर्वाधिक फटका बसतो तो सेलिब्रिटींना. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यात तो महर्षी वाल्मिकींच्या वेशात दिसत होता. या खोट्या व्हिडीओनंतर अक्षयने तीव्र संताप व्यक्त करत थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) अक्षय कुमारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याच्या प्रतिमेचा व व्यक्तिमत्व हक्कांचा भंग करणारे डीपफेक व्हिडीओ आणि एआय कंटेंट तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अशा सामग्रीचा प्रसार करणाऱ्या अज्ञात व्यक्ती आणि काही ई-कॉमर्स साइट्सविरुद्धही कारवाईचे निर्देश दिले आहेत.न्यायाधीशांनी या निर्णयात नमूद केले की, “अशा प्रकारचा एआय-आधारित कंटेंट फक्त एका अभिनेत्याच्या नव्हे तर समाजाच्या सुरक्षेसाठीही धोकादायक ठरू शकतो. डीपफेक इतका वास्तवदर्शी असतो की खरे आणि बनावट व्हिडीओ ओळखणे जवळपास अशक्य बनते. यामुळे व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.”

डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अक्षयने त्याचा सोशल मीडिया खात्यावरून निवेदन केले होते. ज्यात तो म्हणाला होता की, एआयच्या मदतीने तयार केलेला व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात मला महर्षी वाल्मिकी (Maharishi Valmiki) म्हणून दाखवले आहे. पण हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा आहे. माध्यमांनीही त्यावरून बातम्या केल्या, जे चुकीचे आहे. कृपया अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता तपासा.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ