spot_img

Pregnant Women : दिवाळीत गर्भवती महिलांनी ‘या’ गोष्टी करू नयेत दुर्लक्षित

spot_img

दिवाळीत गर्भवती महिलांनी घ्यावी विशेष काळजी

दिवाळी (Diwali) या नावातच उत्साह आहे, आनंद आहे. दिवाळीचे दिवस म्हणजे नातेवाईकांच्या भेटी, भेटवस्तूंची देवाणघेवाण, मुलांसाठी फटाके आणि नवीन कपडे, दारात रांगोळी, कंदील आणि पणत्यांची आरास ! हे आपण दरवर्षी करतोच.मात्र या आनंदाच्या प्रसंगी फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यामुळे यांचा परिणाम आपल्या प्रत्येकाला होतो. अशातच दिवाळीत गर्भवती महिलांनी देखील त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भधारणा ही आयुष्यातील सर्वात महत्वाच्या काळांपैकी एक आहे.दिवाळीच्या या दिवसांमध्ये धूर, मोठा आवाज आणि मिठाईचे जास्त सेवन हे आई आणि बाळ दोघांसाठीही अत्यंत हानिकारक ठरू शकते.

या सणाच्या दिवसांमध्ये गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला तज्ञ देतात. चला आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.फटाके फोडल्यानंतर त्यातून निघणारा धूर आणि रसायनांमुळे हवेतील कार्बन कण वाढतात आणि हे हानिकारक वायू श्वासाद्वारे गर्भवती महिलांच्या शरीरात प्रवेश करतात.ज्यामुळे गर्भवती महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याचा काही परिणाम गर्भातील बाळावरही होऊ शकतो. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत दिल्ली एमसीडीचे डॉ. अजय कुमार म्हणतात की,गर्भवती महिलांनी (Pregnant women) दिवाळीत घराबाहेर पडणे टाळावे. जर बाहेर जाणे अत्यंत आवश्यक असेल तर मास्क घाला. त्यातच जर गरोदर महिलांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. या बाबतीत कोणताही निष्काळपणा करू नका.

जास्त गोड पदार्थ खाऊ नका –

गर्भवती महिला दिवाळीत गोड पदार्थ खाऊ शकतात, परंतु योग्य प्रमाण लक्षात ठेऊनच त्याचे सेवन करावे. कारण गर्भधारणेदरम्यान रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जास्त गोड पदार्थांमुळे गर्भावस्थेच्या वेळेस मधुमेहाचा धोका वाढू शकतो, विशेषतः ज्या महिलांचे वजन जास्त आहे. अशा महिलांनी गोड पदार्थ कमी खावेत आणि जास्त तळलेले किंवा मसालेदार पदार्थ न खाण्याची काळजी घ्यावी. तसेच पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष द्या आणि दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.

मानसिक ताण आणि थकवा यापासून दूर राहा –

दिवाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छता करताना पूजेची तयारी करताना आणि पाहुण्यांना भेटताना थकवा जाणवणे सामान्य आहे, परंतु यासर्वांमधून गर्भवती महिलांनी पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे महत्वाचे आहे. अशातच जर गर्भवती महिलांनी ताणतणाव किंवा थकवा जाणवत असेल तर खोल श्वास घ्या, ध्यान करा आणि कुटुंबाकडून आधार घ्या. कोणतेही शारीरिक काम टाळा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही करा.

प्रकाश, आनंद आणि एकतेने भरलेला दिवाळी सण. या दिवाळी सुरक्षा टिप्सचे पालन करून, तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या बाळासाठी निरोगी आणि आनंदी उत्सव साजरा करू शकता. तुमच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास विसरू नका.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ