Girish Mahajan : ऑपरेशन ब्लूस्टारवरील वक्तव्यामुळे गिरीश महाजन चर्चेत; भाजप नेतृत्व नाराज असल्याची चर्चा

spot_img

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लूस्टार संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात नव्या चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या विधानाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी मांडलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संवेदनशील आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करताना अधिक जबाबदारीने आणि अचूक संदर्भांसह भूमिका मांडणे अपेक्षित असल्याची भावना पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते.

महाजन यांनी ऑपरेशन ब्लूस्टारचा उल्लेख “काळा दिवस” असा करत त्या कारवाईदरम्यान अनेकांचे बलिदान झाल्याचा उल्लेख केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या. यानंतर पक्षाकडून हे विधान वैयक्तिक स्वरूपाचे असून ते भाजपची अधिकृत भूमिका मानली जाऊ नये, असे स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, विषयाची संपूर्ण पार्श्वभूमी किंवा संदर्भ स्पष्ट नसल्यामुळे हे वक्तव्य झाले असावे, अशीही चर्चा पक्षातील सूत्रांकडून होत आहे. या घडामोडींमुळे आता भाजपची अधिकृत भूमिका काय असेल आणि पुढील राजकीय प्रतिक्रिया कशा उमटतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ