दिवाळी हा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. यानिमित्त सर्व महिला आपल्या आऊटफिट, मेकअप याबाबत जय्यत तयारी करत असतात. आपणा सर्वांना चमकदार, निरोगी त्वचा हवी असते. दिवाळीला चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो हवा असेल तर तुमच्या स्वयंपाकघरातील एक घटक तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. मेथीचे दाणे चेहऱ्यासाठी अत्यंत गुणकारी असतात. ( Fenugreek Seeds face pack for instant glow )
मेथीच्या दाण्यांमध्ये व्हिटॅमिन सी, लोह, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जातात आणि त्वचेला पोषण मिळते. मेथीच्या दाण्यांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेवरील मुरुमे कमी होतात.
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.सकाळी मिक्सरमध्ये मेथी दाण्यांची बारीक पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे ठेवून चेहरा धुवा. त्यानंतर यामध्ये तुम्ही मध, दही, गुलाब पाणी आणि कोरफडीचे जेलही मिसळा. मधामुळे त्वचा खोलवर मॉइश्चराइझ होते आणि दह्यामुळे टॅनिंग कमी होते. गुलाब पाण्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो आणि कोरफडीचे जेल मुरुमे कमी करण्यास फायदेशीर असते.
मेथीचे दाणे नैसर्गिक आणि त्वचेसाठी फायदेशीर असले तरी हा फेसपॅक दररोज लावू नये. विशेषतः जर तुमची त्वचा संवेदनशील किंवा कोरडी असेल तर. आधी पॅच टेस्ट करावी. जर पॅच टेस्ट केल्यावर तुम्हाला कोणताही त्रास झाला नाही तर आठड्यातू २ ते ३ वेळा मेथीच्या दाण्यांचा फेसपॅक लावावा.




