Lalit Modi : “तिला ‘गोल्ड डिगर’ म्हणणं चुकीचं, उलट मीच तिचा…”; सुष्मिता सेनवरील टीकेवर ललित मोदींचे सडेतोड उत्तर

spot_img

ललित मोदींनी केला सुष्मितासोबतच्या नात्याबद्दल मोठा खुलासा; “ती स्वतःच्या पायावर उभी असणारी खंबीर महिला” असल्याचा गौरव

सुमारे चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०२२ मध्ये, उद्योगपती आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यांचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. या फोटोंनी संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती आणि त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. देशाबाहेर गेलेले ललित मोदी आणि सुष्मिता एकत्र कसे आले, या प्रश्नासोबतच सुष्मितावर नेटकऱ्यांनी ‘गोल्ड डिगर’ (पैशांसाठी नातं ठेवणारी) म्हणून प्रचंड टीका केली होती. आता या सर्व वादावर ललित मोदी यांनी मौन सोडले असून सुष्मिताची बाजू घेत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ललित मोदी यांनी त्यांच्या नात्याबद्दल मनमोकळा खुलासा केला. ते म्हणाले की, “मी जेव्हा सोशल मीडियावर आमच्या रोमान्सची घोषणा केली, त्यानंतर लोकांनी जे चुकीचे नरेटिव्ह तयार केले, त्याने मी खूप निराश झालो होतो.” सुष्मितावर झालेल्या आरोपांचे खंडन करताना ते पुढे म्हणाले की, सुष्मिता ही आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र महिला असून तिने स्वतःचे साम्राज्य स्वतः उभे केले आहे. ती पैशांसाठी कोणावरही अवलंबून नाही.

“सुष्मिता अत्यंत सुंदर, यशस्वी आणि स्वाभिमानी महिला आहे. माझ्या ओळखीतील लोकांमध्ये सर्वात जास्त हिरे तिच्याकडेच आहेत आणि ते सर्व तिने स्वतःच्या कष्टाने मिळवले आहेत. तिचे स्वतःचे हिऱ्यांचे दुकानही आहे.”

दोघांच्या एकत्र घालवलेल्या क्षणांची आठवण सांगताना ललित मोदींनी एक मजेशीर आणि तितकाच महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले की, “आम्ही जेव्हा जेव्हा एकत्र बाहेर गेलो, तेव्हा सुष्मिताने कधीही माझे पैसे खर्च होऊ दिले नाहीत, ती स्वतःचे बिल स्वतः भरायची. उलट मीच एखाद्या ‘ठेवलेल्या प्रियकरासारखा’ (Kept Boyfriend) होतो.” सुष्मिता कोणाकडूनही सहज काही स्वीकारत नाही, त्यामुळे तिला गोल्ड डिगर म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. उलट, “जर तसे काही असेल, तर ललित मोदी हा ‘डायमंड डिगर’ आहे आणि सुष्मिता एक अस्सल हिरा आहे,” अशा शब्दांत त्यांनी सुष्मिताचे कौतुक केले. माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन ही आजही आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असल्याचे ललित मोदींनी यावेळी आवर्जून सांगितले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ