Chirag Tyadi Murder Case New Revelations : सुस्पर्धेतून वगळल्याचा भयंकर सूड! आंतरराष्ट्रीय पॅरा-अॅथलीट चिराग त्यागीची गोळ्या झाडून हत्या

spot_img

तक्रार केल्याच्या रागातून मित्रानेच गेम केल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड

देशातील गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखात आणखी एका धक्कादायक आणि क्रूर घटनेची भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पॅरा-अॅथलीट चिराग त्यागीची उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे थेट गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गाझियाबादमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या साई उपवन परिसरात चिरागचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. चिराग हा सकाळी दिल्लीतील आपल्या वसतिगृहातून मुरादनगरमधील ‘बसंतपूर साथली’ या मूळ गावी जाण्यासाठी निघाला होता, मात्र वाटेतच त्याचा डाव संपवण्यात आला. या घटनेने क्रीडा जगतासह देशभरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

“चिरागच्या पाठीवर गोळी लागल्याची खूण आढळली आहे. फॉरेन्सिक आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून संशयित सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.”

या भयंकर हत्याकांडाचा तपास करताना पोलिसांनी अत्यंत वेगवान हालचाली करत चिरागचा जुना मित्र यश खटीक याला बेड्या ठोकल्या आहेत. अटक केल्यानंतर यशने पोलिसांसमोर जो खुलासा केला, तो अत्यंत धक्कादायक आहे. यश आणि चिराग हे शाळेच्या दिवसांपासूनचे एकमेकांचे घट्ट मित्र होते आणि अंध गटामधून (Blind Category) एकत्र ॲथलेटिक्सचा सराव करायचे. मात्र, काही दिवसांपूर्वी क्रीडा स्पर्धेच्या कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान चिरागने यशच्या विरोधात एक तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीमुळे यशला अपात्र ठरवून थेट स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. करिअर उद्ध्वस्त झाल्याच्या रागातून आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी यशने चिरागचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने बेकायदेशीरपणे एक पिस्तूल मिळवले आणि चिराग दिल्लीहून गावाकडे जात असल्याची संधी साधून त्याच्यावर पाठीमागून गोळी झाडली. या प्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ