Aniket Tatkare : रायगडची जागा राष्ट्रवादीकडे; उमेदवारी निश्चित होताच अर्ज दाखल करण्यासाठी अनिकेत तटकरे रवाना

spot_img

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीने अखेर आपला उमेदवार निश्चित केला असून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. पक्षाचे युवा नेते अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. रायगडमधील सुतारवाडी येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधींसह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.

उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अनिकेत तटकरे आपल्या समर्थकांसह अर्ज भरण्यासाठी रवाना झाले. यापूर्वी त्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे महायुतीतील समन्वयानंतर राष्ट्रवादीला ही जागा मिळाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्या अर्ज कायम ठेवणार की मागे घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

याचवेळी राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत नाराजीचीही चर्चा रंगली आहे. विधानपरिषदेसाठी इच्छुक असलेले पक्षाचे प्रवक्ते राजीव साबळे हे सुतारवाडीतील बैठकीस अनुपस्थित राहिले. त्यांच्या समर्थकांनीही बैठकीकडे पाठ फिरवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उमेदवारीबाबत पक्षाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा असून, आगामी काळात या नाराजीचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ