Girish Kumar : बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरलेला अभिनेता आज 4700 कोटींच्या साम्राज्याचा मालक

spot_img

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सना संधी सहज मिळते, अशी नेहमी चर्चा असते. मात्र मोठ्या घराण्याचा वारसा असला तरी प्रेक्षकांची पसंती मिळवणे प्रत्येकासाठी सोपे नसते. काही कलाकार मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण करतात, तर काहींना अनेक संधी मिळूनही अभिनय क्षेत्रात अपेक्षित यश मिळत नाही. अभिनेता गिरीश कुमार यांची कहाणीही काहीशी अशीच आहे.

प्रसिद्ध निर्माता कुमार एस. तौरानी यांचा मुलगा असलेल्या गिरीश कुमार यांचा संबंध बॉलिवूडमधील नामांकित Tips Industries कंपनीशी आहे. संगीत आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात मोठं नाव असलेल्या या बॅनरमुळे गिरीश यांच्या पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 2013 साली त्यांनी ‘रमैया वस्तावैया’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री श्रुती हासन आणि अभिनेता सोनू सूद महत्त्वाच्या भूमिकेत होते. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रभू देवा यांनी केले होते.

मोठ्या प्रमाणावर प्रमोशन आणि चर्चेनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल करू शकला नाही. चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाहीच, शिवाय गिरीश यांच्या अभिनयावरही टीका झाली. पहिलाच चित्रपट अपयशी ठरल्यानंतर त्यांनी काही इतर प्रकल्पांमध्येही काम केले, मात्र त्यांना अभिनेता म्हणून यश मिळू शकले नाही.

अभिनय क्षेत्रात करिअर स्थिर न झाल्यानंतर गिरीश यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय सहभाग घेत Tips Industries च्या कामकाजात जबाबदारी स्वीकारली. व्यवसायातील त्यांच्या सहभागामुळे कंपनीने मोठी प्रगती केली आणि आज गिरीश कुमार कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक म्हणून ओळखले जातात. अभिनयात यश न मिळालं तरी व्यवसाय क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ