spot_img

Diwali 2025 : लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी करावे? २० की २१ ऑक्टोबर कोणत्या तारखेला आहे लक्ष्मीपूजन?

spot_img

हिंदूधर्मामध्ये ‘दीपावली’ (diwali )अतिशय महत्त्वपूर्ण मानला जाणारा सण आहे. या सणात लोक भरपूर दिवे लावतात त्याबरोबरच आकाश कंदील देखील घरासमोर लावला जातो. भारतात धनत्रयोदशी अर्थात धनतेरस आश्‍विन वद्य त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते तर ,आश्‍विन वद्य चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी, अमावास्या तिथीस लक्ष्मीपूजन आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा तिथीस बलीप्रतिपदा, त्याबरोबरच कार्तिक महिन्याच्या द्वितीया तिथीला भाऊबीज, अशा पद्धतीने दिवाळी सण साजरा केला जातो.

हिंदुधर्मात दिवाळीमधील लक्ष्मी पूजनास विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीस लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरांमध्ये धनाची देवता लक्ष्मीमाता, कुबेर देवता, गणपती बाप्पाचीही विधीवत पूजा केली जाते. पण यंदाच्या वर्षी लक्ष्मीपूजन नक्की 20 ऑक्टोबर की 21 ऑक्टोबर रोजी आहे, यावरुन नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झालाय. लक्ष्मीपूजनाची खरी तारीख कोणती व कोणत्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचे?, या प्रश्नामुळे लोक संभ्रमात पडत आहेत. याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया…

लक्ष्मीपूजन तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.44 वाजता सुरू होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5.54 वाजता तिथी समाप्त होणार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणं शास्त्रसंमत आहे.

तज्ज्ञांच्या मते, लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त 21 ऑक्टोबर रोजी सूर्यास्तानंतर जवळपास अडीच तास आहे. ज्योतिषशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ शिरीष कुलकर्णी यांच्या माहितीनुसार लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 6.10 वाजेपासून ते रात्री 8.40 वाजेदरम्यान करू शकता.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ