Navi Mumbai : बाजीराव शिंदे नवे पणन संचालक; शरद जरे पुन्हा मुंबई APMC सचिवपदी!

spot_img

बाजार समित्यांमध्ये शिस्त राखण्याचे आणि शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्याचे नवे आव्हान आता शिंदेंच्या खांद्यावर.

राज्याच्या पणन संचालनालयात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून, प्रभारी पणन संचालक शरद जरे यांच्या जागी बाजीराव शिंदे यांची नवीन पणन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर शरद जरे यांच्याकडे पुन्हा एकदा मुंबई APMC च्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. बाजीराव शिंदे हे यापूर्वी ‘महाप्रित’ (मुंबई) येथे सहनिबंधक म्हणून कार्यरत होते, त्यांना पदोन्नती देऊन पुणे येथील पणन संचालनालयात नियुक्त केले गेले आहे. शरद जरे यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील बाजार समित्यांमध्ये बिनपरवाना शेतमाल विक्री, अन्नपदार्थांमधील भेसळ आणि शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलून प्रशासकीय शिस्त आणली होती. आता नवीन पणन संचालक बाजीराव शिंदे यांच्या नियुक्तीमुळे बाजारपेठेतील अनियमितता, बेकायदा व्यापार आणि शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी ते कोणती कडक भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्यभरातील शेतकरी आणि बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ