spot_img

Kubra Sait : अभिनेत्री कुब्रा सैतने वैयक्तिक आयुष्याबबत केला मोठा खुलासा !

spot_img

वन नाइट स्टँड अन् डायरेक्ट प्रेग्नंट झाली बॉलिवूड अभिनेत्री

अश्नीर ग्रोवरचा रिअॅलिटी शो ‘राईज अँड फॉल’चा (Rise and Fall) नुकताच फिनाले पार पडला. या शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री कुब्रा सैत (Kubra Sait) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अलिकडेच तिनं तिच्या आयुष्यातील एका धक्कादायक वळणाबाब खुलासा केलेला. कुब्रा सैतने अनेक हिंदी चित्रपट, वेब सीरीजमध्ये काम केलं आहे. सेक्रेड गेम्स, जवानी जानेमन, देवा आणि रेडी या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ती आजही ओळखली जाते. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत कुब्रा सैतने तिच्या आयुष्यातील या प्रसंगाविषयी भाष्य केलं आहे.

विरल भयानीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या द्विधा मनस्थितीबद्दल बोलताना अभिनेत्रीने म्हटलं, “त्या घटनेला अनेक वर्षे झाली आहेत आणि मला त्याबद्दल विचार करण्यासाठी त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ मिळाला. मात्र, तुमच्या आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा तुम्ही एका द्विधा मनस्थितीत सापडता कारण तुमचा विश्वास, तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमच्या सभोवतालचं जगही तिथं असतं. तुम्हाला तुमची कर्तव्ये काय आहेत हे माहित असते, तुम्हाला माहिती असते की समाज तुमच्याकडे कोणत्या नजरेनं पाहतोय.त्यामुळे तुम्हाला चूक आणि बरोबर काय असतं यांच्यात अडकल्यासारखं वाटतं.”

मग पुढे कुब्रा सैत तिच्या त्या निर्णयाबद्दल बोलताना म्हणाली,”त्यावेळी तुमचा निर्णय योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहित नसतं. पण आज, मी आत्मविश्वासाने म्हणू शकते की मी त्यावेळी घेतलेला निर्णय माझ्यासाठी योग्य होता. कारण मला माहित आहे की जरी मी चूक केली असती तरी देव सगळं बघतोय आणि मला त्याचे परिणाम भोगावे लागले असते.” असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील भावनांना मोकळीक करुन दिली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ