Rahul Gandhi Targets Narendra Modi : नॉर्वेमध्ये मोदींना माध्यम स्वातंत्र्यावर प्रश्न; राहुल गांधींकडूनही टीका

spot_img

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील युरोप दौऱ्यात नॉर्वेमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान माध्यम स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या मुद्द्यावरून चर्चा रंगली. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर पत्रकार परिषद पार पडली होती. यावेळी एका विदेशी पत्रकाराने भारतातील माध्यम स्वातंत्र्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या स्वतंत्र भारतीय पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकाराने भारतातील मानवाधिकार उल्लंघन आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याबाबत थेट सवाल उपस्थित केले.

या प्रश्नांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी ठाम शब्दांत उत्तर देत भारताची भूमिका स्पष्ट केली. मात्र, संबंधित महिला पत्रकाराने नंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, भारताचे पंतप्रधान पत्रकारांसमोर थेट बोलले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही टीका करत पंतप्रधानांनी प्रश्नांना सामोरे जाणे टाळल्याचा आरोप केला. तसेच, ही बाब देशासाठी लाजिरवाणी असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ