Sanjay Raut : “महागाईचे खापर मुस्लिमांवर फोडून भाजप मते मागेल”; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर विखारी हल्ला

spot_img

अमेरिकेतून अदानींचे खटले मोदींनी काढले, पण देशातील सामान्यांवर महागाई लादली; निवडणुका घेण्याचे दिले आव्हान

शिवसेना नेते संजय राऊत यांनी वाढत्या इंधन दरवाढीवरून आणि महागाईवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर जनतेवर महागाईचा बोजा टाकून पंतप्रधान परदेश दौऱ्यावर निघून गेल्याचा टोला त्यांनी लगावला. महागाई वाढल्यामुळे देशातील मध्यमवर्गीयांमध्ये भीतीचे वातावरण असून, यामुळे भविष्यात आर्थिक अराजक निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, या महागाईला धार्मिक रंग देऊन लोकांचे लक्ष भरकटवले जाईल आणि लोक पुन्हा भाजपलाच मतदान करतील, अशी खोचक टीकाही राऊत यांनी केली.

मोदी राजवटीत महागाईविरोधात आंदोलन करणे म्हणजे देशद्रोह ठरवला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. जनतेसमोर आता केवळ उपासमारीने मरणे किंवा गप्प बसणे हेच पर्याय उरल्याचे सांगत त्यांनी भाजप सरकार हे गैरमार्गाने सत्तेवर आल्याचा पुनरुच्चार केला. जर हिंमत असेल तर भाजपने पुन्हा निवडणुका घेऊन दाखवाव्यात, तेव्हाच जनता कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होईल, असे आव्हान त्यांनी दिले. या संपूर्ण मुद्द्यावर त्यांनी अमेरिकेतील अदानींवरील खटल्यांचा संदर्भ देत, सामान्यांना न्याय मिळत नसून केवळ मोठ्या उद्योगपतींचेच भले केले जात असल्याचा थेट आरोप केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ