India A Squad For Tri Series In Sri Lanka and Schedule : ‘इंडिया ए’चा श्रीलंका दौरा जाहीर; १५ वर्षीय वंडरबॉय वैभव सूर्यवंशीसह आयपीएल स्टार्सना सुवर्णसंधी!

spot_img

तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर रियान पराग उपकर्णधार; ९ जूनपासून श्रीलंका आणि अफगाणिस्तान विरुद्ध रंगणार तिरंगी मालिका

आयपीएल २०२६ चा थरार संपल्यानंतर भारतीय युवा क्रिकेटपटूंची फौज थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. बीसीसीआयने आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी १५ सदस्यीय ‘इंडिया ए’ (India A) संघाची घोषणा केली असून, या दौऱ्यात भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात ९ ते २१ जून दरम्यान टी-२० तिरंगी मालिका खेळवली जाणार आहे. एकूण ७ सामन्यांच्या या मालिकेत प्रत्येक संघाला साखळी फेरीत ४ सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. निवड समितीने या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी धडाकेबाज फलंदाज तिलक वर्मा याच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवली आहे, तर आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रियान परागला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.

या संपूर्ण दौऱ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते १५ वर्षांच्या युवा फलंदाजाने, ज्याचे नाव आहे वैभव सूर्यवंशी. भारताला अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या वैभवने आयपीएल २०२६ च्या १९ व्या मोसमातही आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याला लवकरच भारतीय वरिष्ठ संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याने, त्याच्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या संघात वैभवसह आयुष बडोनी, प्रभसिमरन सिंग, निशांत सिंधू आणि अंशुल कंबोज यांसारख्या आयपीएल गाजवणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंचा भरणा करण्यात आला आहे.

‘इंडिया ए’चे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे:

  • ९ जून (मंगळवार): भारत ए विरुद्ध श्रीलंका ए
  • ११ जून (गुरुवार): भारत ए विरुद्ध अफगाणिस्तान ए
  • १५ जून (सोमवार): भारत ए विरुद्ध श्रीलंका ए
  • १७ जून (बुधवार): भारत ए विरुद्ध अफगाणिस्तान ए
  • २१ जून (रविवार): अंतिम सामना (फायनल)

श्रीलंका दौऱ्यासाठी ‘इंडिया ए’चा संघ:

तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, सुर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज आणि अर्शद खान.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ