IPL 2026 : बुमराहच्या नेतृत्वात मुंबईचा पंजाबवर ‘धुव्वा’; विजयानंतरही गुणतालिकेत मात्र ‘जैसे थे’ स्थिती

spot_img

पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव; प्लेऑफसाठी आता उरलेल्या दोन सामन्यांत ‘करा किंवा मरा’ स्थिती

आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा ६ गडी राखून पराभव केला. पंजाबने दिलेले २०१ धावांचे डोंगरासारखे आव्हान मुंबईने सहज पेलले आणि या मोसमातील आपला चौथा विजय नोंदवला. जरी मुंबईचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले, तरी या विजयाने त्यांनी पंजाब किंग्सच्या अडचणीत मात्र मोठी भर घातली आहे. सलग पाचव्या पराभवामुळे पंजाबचे प्लेऑफचे समीकरण आता कमालीचे गुंतागुंतीचे झाले आहे.

स्पर्धेच्या सुरुवातीला सात सामने अजिंक्य राहण्याचा विक्रम करणाऱ्या पंजाबला आता प्लेऑफ गाठण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. पंजाबच्या खात्यात सध्या १२ सामन्यांनंतर १३ गुण असून, त्यांना आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) या दोन तगड्या संघांचा सामना करावा लागणार आहे. आरसीबी स्वतः प्लेऑफच्या शर्यतीत असल्याने पंजाबसाठी पुढचा रस्ता अतिशय खडतर असणार आहे. विशेष म्हणजे, या निकालानंतरही गुणतालिकेतील पहिल्या काही स्थानांमध्ये कोणताही मोठा फेरबदल झालेला नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ