spot_img

Drink Milk : दुधामुळे वाढू शकतं का रक्तातील साखरेचे प्रमाण ?

spot_img

मधुमेह असणारे दूध पिऊ शकतात का?

मधुमेहाच्या (Diabetes) आहाराबाबत,नेहमीच परस्परविरोधी सल्ला आणि वेगवेगळी मते असतात, ज्यामुळे रुग्णांमध्ये गोंधळ निर्माण होतो. एक सामान्य प्रश्न उद्भवतो तो म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांसाठी दूध पिणे सुरक्षित आहे का ? जगप्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ आणि चेन्नईतील डॉ. व्ही. मोहन यांच्या मधुमेह विशेषज्ञ केंद्राचे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन यांनी सोशल मीडियावर पसरणाऱ्या एका लोकप्रिय समजुतीवर भाष्य केले – मधुमेह असलेल्या लोकांनी दूध पिऊ नये.”काही पोषणतज्ञ तर असे म्हणतात की दूध हे सुरुवातीला मधुमेहाचे कारण आहे. तथापि,अशा विधानांना कोणताही आधार नाही.ही एक शुद्ध मिथक आहे,” असे ते स्पष्ट करतात. ज्यांना शुगर आहे म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे त्यांना त्यांच्या खाण्या-पिण्याबद्दल फार खाळजी घ्यावी लागते. मधुमेही रुग्णांना त्यांच्या आहाराबद्दल कूप काळजी घेणे गरजेचे असते.कारण आहारात जर गडबड झाली तर त्यांच्या साखरेमध्ये खूप चढ-उतार होतात. तसेच अनेकदा असा प्रश्न असतो की मधुमेही रुग्ण दूध पिऊ शकतात का? कारण अनेकांच्या मानात असते की दूध प्यायल्याने शुगर वाढू शकते.

मधुमेही रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी, आहारातील कार्बोहायड्रेट्स नियंत्रित करणे हे निरोगी फॅट्स आणि प्रथिने वाढवण्याइतकेच महत्वाचे आहे. आहारातील प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यासाठी दूध हा सर्वोत्तम अन्न मानले जाते. परंतु दूधामुळे असणाऱ्या याच संभ्रमामुळे मधुमेही रुग्ण दूधाचे सेवन करण्यास घाबरतात. लोकांचा असा विश्वास आहे की दूध प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेही रुग्णांमध्ये दूध सेवन करावे की नाही याबद्दल अनेकदा गोंधळ असतो. फुल क्रीम दुधात जास्त चरबी आणि कॅलरीज असतात, म्हणून डॉक्टर अनेकदा मधुमेही रुग्णांना स्किम्ड किंवा टोन्ड दूध पिण्याचा सल्ला देतात.

मधुमेही रुग्ण मर्यादित प्रमाणात फुल क्रीम दूध (Full cream milk) पिऊ शकतात. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे दुधाचा ग्लायसेमिक इंडेक्स 27 ते 34 पर्यंत असू शकतो. जर 500 मिली फुल क्रीम अमूल दुधाच्या ग्लायसेमिक इंडेक्सबद्दल बोललो तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 7.5 आहे जो खूप कमी आहे. दूध हे मधुमेही रुग्णांसाठी एक संपूर्ण अन्न आहे जे आपल्या शरीराला आवश्यक आहे. मधुमेही रुग्णांनी फुल क्रीम दूध प्यावे कारण त्यात मर्यादीत फॅट असते जे हृदयाचे रक्षण करते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी फुल क्रीम दूध प्यायल्याने काहीही धोका होणार नाही.तज्ज्ञांनी असेही म्हटले आहे की दुधामुळे मधुमेह होत नाही. जरी तुम्हाला आधीच मधुमेह असेल तरी तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय दूध पिऊ शकता.फक्त त्यात साखर न घालता.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ