बिग बॉस मधील तान्या मित्तलशी होतेय राखीची तुलना
अभिनेत्री राखी सावंत आपल्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते.बॉलिवूडची (Bollywood News) ड्रामेबाज, टीआरपी क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) याना त्या कारणानं चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती आणि तिचे नवनवे दावे, चर्चेचा विषय ठरत आहेत. अलिकडेच मुंबईला परतलेली राखी सावंत सोशल मीडियावर चर्चेत आहे. अशातच आता राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून आता राखी सावंतनं ‘बिग बॉस 19’च्या (Bigg Boss 19) घरातल्या तान्या मित्तलच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचं बोलत आहेत.या व्हिडीओमध्ये राखी सावंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल बोलत आहे. राखी म्हणतेय की, माझ्या डोनाल्ड पप्पांनी माझ्यासाठी बंगला बांधलाय. या व्हिडीओमध्ये राखी सावंत एक डायमंडच्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि ती म्हणते, “थँक यू पापा डोनाल्ड ट्रम्प. माझे डोनाल्ड पापा माझ्यासाठी सगळं काही करतात. त्यांनी माझ्यासाठी आता अमेरिकेत एक खूप मोठा बंगला बांधला आहे. थँक यू पाप्पा डोनाल्ड.” याचवेळी कोणीतरी काहीतरी बोलतं, त्याला उत्तर देताना राखी पुन्हा म्हणते, “बेंगलोर नाही… बंगलो.” राखी सावंतचा हा व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे
राखी व्हिडीओमध्ये पुढे म्हणते, “मी लंडनला जात आहे, अमेरिकेला जात आहे. पाप्पा डोनाल्ड ट्रम्प यांनी मला माझी फेव्हरेट कार दिली आहे. ट्रम्प माझे पप्पा आहेत.” राखीच्या या व्हिडीओवर युजर्स मजोशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत आणि तान्या मित्तलचं नाव घेत तिची खिल्ली उडवत आहेत. काही युजर्स तर असंही म्हणत आहेत की या व्हिडीओद्वारे राखी तान्या मित्तलवर निशाणा साधत आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, “तान्या मित्तल प्रो.” तर दुसऱ्याने लिहिलं, “अमेरिकेची पुढची प्रेसिडेंट राखी ट्रम्प.” एकाने लिहिलं, “ही तान्या मित्तलपासून काही जास्तच प्रेरित झाली आहे.”




