Samir Choughule Mets Raj Thackeray : “दादरलाच आहात तर घरी येऊन जा”; राज ठाकरेंनी समीर चौघुलेंना बोलावून दिलं खास सरप्राईज

spot_img

मराठी मनोरंजन सृष्टीचा लाडका अभिनेता समीर चौघुले यांच्या ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या एकपात्री कार्यक्रमाचा झंझावात सुरू असून, नुकताच या प्रयोगाचा शंभरावा टप्पा यशस्वीपणे पार पडला. या यशाची दखल चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. राजसाहेबांनी स्वतः समीर यांना फोन करून ‘शिवतीर्था’वर भेटीसाठी बोलावले. एका कलासक्त नेत्याने दिलेली ही कौतुकाची थाप समीर यांच्यासाठी अत्यंत अनपेक्षित आणि भारावून टाकणारी ठरली. या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी समीर आणि त्यांच्या पत्नीला एक खास भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मानही केला.

समीर चौघुले यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत राज ठाकरेंना ‘राजामाणूस’ असे संबोधले आहे. कोणत्याही अश्लील किंवा दुहेरी अर्थाच्या विनोदांचा आधार न घेता, अडीच तास प्रेक्षकांना निखळ हसवणाऱ्या समीर यांच्या प्रतिभेचे राज ठाकरेंनी भरभरून कौतुक केले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानंतर आता रंगभूमीवरही समीर यांनी आपली जादू कायम राखली असून, राजसाहेबांनी दिलेल्या या ‘रॉयल’ पावतीमुळे सध्या सोशल मीडियावर समीर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ