Zen Sadavarte : संतापलेल्या ‘मर्सिडीज’ वाली महिलेविरोधात झेन सदावर्ते आक्रमक

spot_img

भाजपच्या जनआक्रोश मोर्चात मंत्र्यांना ‘गेट आऊट’ म्हणणं पडणार महागात? लेखी तक्रार दाखल

मुंबईतील जांभोरी मैदानात भाजपच्या वतीने आयोजित ‘नारी वंदन विधेयक’ समर्थनार्थ मोर्चात एका महिलेने घातलेल्या राड्याला आता नवे वळण मिळाले आहे. वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या या महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना ‘शट अप’ आणि ‘गेट आऊट’ म्हणत अंगावर पाण्याची बाटली भिरकावली होती. गिरीश महाजन यांनी हे प्रकरण सामोपचाराने हाताळले असले तरी, गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने आता या महिलेविरोधात वरळी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

झेन सदावर्ते हिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित महिलेने भररस्त्यात मोर्चेकऱ्यांशी असभ्य वर्तन केले आणि अपमानजनक शब्दांचा वापर करून लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनात अडथळा आणला. एका बाजूला सर्वसामान्यांच्या त्रासाचे समर्थन केले जात असताना, दुसऱ्या बाजूला कायदेशीर कारवाईची मागणी झाल्याने हा वाद आता अधिक पेटण्याची चिन्हं आहेत. मर्सिडीजमधून उतरून मंत्र्यांशी हुज्जत घालणाऱ्या त्या महिलेवर पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ