MERC : उन्हाळ्याच्या झळा सोसणाऱ्या मुंबईकरांना दिलासा! १ एप्रिलपासून वीज बिलात मोठी कपात; खिशाला मिळणार ‘थंडावा’

spot_img

MERC चा मोठा निर्णय: टाटा, अदानी आणि बेस्टच्या दरात १० ते १४ टक्क्यांची घट; मे महिन्याच्या बिलात होणार प्रत्यक्ष बचत

राज्यात उन्हाचा पारा वाढत असतानाच, घरातील एसी आणि कुलरच्या वाढत्या वापरामुळे येणाऱ्या अव्वाच्या सव्वा वीज बिलाची चिंता आता मिटणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) सर्वसामान्यांना मोठा सुखद धक्का दिला असून, उद्या १ एप्रिल २०२६ पासून मुंबईसह राज्यातील वीज दरात लक्षणीय कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः मुंबईतील बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या तिन्ही प्रमुख कंपन्यांच्या दरपत्रकात मोठी घट करण्यात आली असून, यामुळे ग्राहकांच्या मासिक बजेटला मोठा आधार मिळणार आहे.

या नवीन दर कपातीचा सर्वाधिक फायदा मध्यमवर्गीय आणि जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. टाटा पॉवरच्या दरात सुमारे ९.७ टक्के, तर ५०० युनिटपेक्षा जास्त वापर असणाऱ्या श्रेणीत तब्बल १४ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. नवीन दरानुसार, १०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी आता प्रति युनिट ₹ ३.८४ ते ₹ ४.९३ दरम्यान मोजावे लागतील. केवळ मुंबईच नव्हे, तर उर्वरित महाराष्ट्रातील महावितरणच्या (MSEB) ग्राहकांसाठीही पाच वर्षांच्या विशेष आराखड्यांतर्गत दिलासा देणारी बातमी आहे. येत्या काळात वीज दरवाढ होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, एप्रिलमधील या कपातीचा प्रत्यक्ष परिणाम मे महिन्यात हातात येणाऱ्या बिलावर दिसून येईल. वाढत्या महागाईच्या काळात सरकारने दिलेला हा ‘पॉवरफुल’ दिलासा खरोखरच कौतुकास्पद ठरत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ