Pune Crime : गहू-बाजरीच्या पिकात केली गांजाची शेती; एकाला अटक

spot_img

ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे

जुन्नर तालुक्यातील इंगळून परिसरात शेतामध्ये अवैधरित्या गांजाची लागवड करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि जुन्नर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपीकडून लहान-मोठी एकूण ८० गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिनकर विठ्ठल डामसे (वय ६०, रा. इंगळून, ता. जुन्नर) असे आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार अजित गेंगजे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इंगळून येथील एका शेतात गांजाची लागवड सुरू असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. पाहणीदरम्यान गहू आणि बाजरीच्या पिकामध्ये लपवून गांजाची झाडे लावलेली आढळून आली. हे शेत डामसे यांचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनीच ही लागवड केल्याची कबुली दिली. त्यानंतर पंचासमक्ष पंचनामा करून सर्व गांजाची झाडे जप्त करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि जुन्नर पोलिसांनी संयुक्तपणे पार पाडली.

मिळालेल्या बातमीनुसार गुन्हे शाखा तसेच जुन्नर पोलीस स्टेशन कडील स्टाफ यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, गव्हाच्या  तसेच बाजरीच्या शेतामध्ये गांजाची झाडे लावल्याचे दिसून आले. सदरचे शेत दिनकर विठ्ठल डामसे यांचे असल्याचे समजल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सदर गांजाची झाडे त्यांनी लावल्याचे कबूल केले. सदर ठिकाणी पंचा समक्ष पंचनामा करून गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक किरण अवचर,सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शेलार,सहाय्यक फौजदार दीपक साबळे,पोलीस हवालदार राजू मोमीन,संदीप वारे,अक्षय नवले, निलेश सुपेकर, महिला पोलीस हवालदार  जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सागर हिले,सागर शिंदे, गणेश शिंदे,अजित गेंगजे, संतोष पठारे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ