Sushma Andhare : रुपाली चाकणकर प्रकरणावर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल; सखोल चौकशीची मागणी

spot_img

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत त्यांच्या राजीनाम्यामागे पक्षांतर्गत दबाव असल्याचा दावा केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, राजीनाम्याची मागणी बाहेरून नव्हती, तर तो पक्षाच्या अंतर्गत प्रक्रियेचा भाग होता.

अंधारे यांनी पुढे असेही म्हटले की, येत्या काळात चाकणकर यांना चौकशीसाठी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर पदावर असताना अटक झाली असती, तर पक्षाची प्रतिमा अधिक मलिन झाली असती, त्यामुळेच त्यांचा राजीनामा घेण्यात आला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

या प्रकरणात खरात याच्याशी संबंधित गंभीर मुद्द्यांवरही अंधारेंनी प्रश्न उपस्थित केले. चाकणकर यांनीच खरातला गेल्या १२-१३ वर्षांपासून ओळखत असल्याचे सांगितले असल्याचे त्यांनी नमूद केले. खरातला शस्त्र परवाना कोणी दिला, त्याच्या ट्रस्टला निधी कोणी पुरवला आणि त्याच्या मागे नेमके कोण आहेत, याचा सखोल तपास होणे गरजेचे असल्याची मागणी त्यांनी केली.

गेल्या १६ वर्षांपासून खरातकडून असे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत, या काळात हजारो प्रकरणे घडली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

अंधारे यांनी मनकर्ण आवारे या व्यक्तीचाही उल्लेख करत, त्या जगदंब पतसंस्थेशी संबंधित असून खरात आणि चाकणकर यांच्यासोबत त्यांचे आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप केला. या सर्व बाबींची सखोल चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ