Cyber Fraud : ‘BSF’ अधिकारी बनून सायबर भामट्यांनी कंपनीला लावला २६ लाखांचा चुना

spot_img

खरेदी विभागातील ‘अक्षय कुमार’ बोलतोय म्हणत रचला बनावट ऑर्डरचा सापळा; विश्वासासाठी आधी धाडले १०-२० रुपये

सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीसाठी थेट देशाच्या सुरक्षा दलांच्या नावाचा वापर करण्यास सुरुवात केल्याने एकच खळबळ माजली आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून, संरक्षण दलांना ‘हार्ड प्लास्टिक केसेस’ पुरवठा करणाऱ्या एका कंपनीला लुटण्यात आले आहे. ९ मार्च रोजी एका भामट्याने कंपनीला फोन करून आपण सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) खरेदी विभागातून ‘अक्षय कुमार’ बोलत असल्याचे भासवले. त्याने बीएसएफसाठी मोठी ऑर्डर असल्याचे सांगून बनावट ओळखपत्रांच्या जोरावर कंपनीचा विश्वास संपादन केला. इतकेच नाही तर, व्यवहार भारतीय लष्कराच्या नियमांनुसारच होतील, असे भासवण्यासाठी त्याने ‘कुलदीप सिंग’ नावाच्या दुसऱ्या बनावट व्यक्तीचा आधार घेत सुरुवातीला केवळ १० आणि २० रुपयांचे छोटे व्यवहार करून कंपनीला पूर्णपणे जाळ्यात ओढले.

हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सायबर चोरांनी एक मोठी खेळी खेळली. त्यांनी कंपनीला काही रक्कम तात्पुरती परत पाठवली, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीची खात्री पटली की हा व्यवहार अधिकृत आहे. मात्र, २१ मार्च रोजी आरटीजीएस (RTGS) आणि नेफ्ट (NEFT) च्या नावाखाली विविध बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यास भाग पाडत, या टोळीने कंपनीकडून तब्बल २६ लाख २२ हजार ३९१ रुपये लांबवले. पैसे मिळाल्यावर बनावट कंपनीचे सर्व संपर्क क्रमांक बंद झाले, तेव्हा कुठे कंपनीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पूर्व विभागीय सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोणत्याही अनोळखी क्रमांकावर अंधळा विश्वास ठेवू नका आणि ‘ओटीपी’ किंवा बँक तपशील कोणाशीही शेअर करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ