Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या अडचणी वाढल्या? अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळला

spot_img

ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात ठाणे न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांना तात्पुरता दिलासा मिळालेला नसून, पुढील काही दिवसांत पोलिसांकडून कायदेशीर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.

हे प्रकरण विनायक राऊत यांच्या सूनबाई गिरिजा राऊत यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर समोर आले. त्यांच्या तक्रारीच्या आधारे विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची शक्यता लक्षात घेऊन संबंधितांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिल्याने त्यांची कायदेशीर अडचण आणखी वाढली आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जुलै रोजी होणार असून, तोपर्यंत न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तपासाच्या गरजेनुसार ठाणे पोलिस संबंधितांची चौकशी करण्याबरोबरच आवश्यक वाटल्यास पुढील कायदेशीर पावले उचलू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाकडे राज्यातील राजकीय घडामोडींशी जोडूनही पाहिले जात असून, पुढील सुनावणी आणि पोलिसांची भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ