Thief Arrested For Chain Snatching : वृद्ध महिलेच्या घरात घुसून मंगळसूत्र हिसकवणारा चोरटा जेरबंद

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि.२९ एप्रिल [ रमेश तांबे ]

दुपारच्या वेळी वयोवृद्ध महिलेच्या घरात घुसून मारहाण करीत सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणारा चोरट्याला जेरबंद करण्यात  पोलिसांना यश आले आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली आहे.
रवींद्र गणपत राजगुरू वय,५४ रा.अक्षय नगर,भोसरी, पिंपरी चिंचवड मूळ राहणार सावरगाव ता.जुन्नर जि.पुणे असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत कल्पना बाजीराव राजगुरू वय ६२ वर्ष राहणार सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावरगाव ता.जुन्नर येथील कल्पना बाजीराव राजगुरू हि वृद्ध महिला दुपारच्या वेळी घरी असताना एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते तसेच त्यांना जबर मारहाण त्यांच्या तोंडात दगड कोंबून त्यांचे चार दात पाडले होते. त्यावरून जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.

सदरच्या घटनेचे गांभीर्य लक्षात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी सदर गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास करून, आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास करत असताना, सावरगाव जुन्नर येथील घटनास्थळाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, एक संशयित इसम मोटरसायकलवर जाताना दिसून आला. पण थोडा पुढे नारायणगावच्या बाजूला गेल्यानंतर आरोपीने गुन्हा करते वेळी घातलेली कपडे पोलिसांना चकवा देण्यासाठी बदलून दुसरी कपडे परिधान केली. आरोपीने पोलिसांना चकवा देण्याकरिता अनेक वेळा रस्ता बदलला, कपडे बदलले पण त्यानंतर देखील गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळापासून त्या संशयित इसमाचा मागोवा काढत भोसरीपर्यंत  सीसीटिव्ही फुटेज प्राप्त केले. मिळालेले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयतीत इसमाचे तसेच त्याने वापरलेल्या गाडीची गोपनीयबातमीदारा मार्फत माहिती घेतली असता सदर संशयित इसम हा रवींद्र गणपत राजगुरू वय ५४ सध्या राहणार भोसरी, पिंपरी चिंचवड मूळ राहणार सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे असल्याचे समजले.

दि. २८ एप्रिल रोजी रवींद्र राजगुरू हा घोडेगाव फाटा जुन्नर येथे येणार असल्याचे गोपनीय बातमीदारा मार्फत समजल्याने सदर ठिकाणी सापळा लावून,त्यास गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.दरम्यान कल्पना राजगुरू ह्या वयस्कर असून घरी एकट्याच असल्याचे लक्षात आल्याने,त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे. सदर आरोपीस जुन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रघुनाथ शिंदे हे करत आहेत.

सदरची कार्यवाही पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,पोलीस निरिक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दिपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमीन,पोलीस हवालदार संदीप वारे,पोलीस हवालदार अक्षय नवले,पोलीस शिपाई  अभिमन्यू मोटे यांनी केली आहे. 

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ