Sanjay Shirsat : मास्टरमाइंडच्या शोधासाठी ‘एसआयटी’ चौकशीची मागणी; संजय शिरसाठ यांचा एमआयएमवर थेट प्रहार

spot_img

आरोपी निदा खानच्या अटकेनंतर राजकीय वातावरण तापले; ‘नारेगाव’ नशेखोरांचे केंद्र असल्याचा मंत्र्यांचा खळबळजनक आरोप

नाशिकमधील एका खासगी कंपनीत उघडकीस आलेल्या ड्रग्ज आणि फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या अटकेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाठ यांनी या संपूर्ण प्रकरणामागे ‘एमआयएम’चा (MIM) हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी तातडीने एसआयटी (SIT) चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे शिरसाठ यांनी स्पष्ट केले आहे.

संजय शिरसाठ यांनी पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढताना म्हटले की, निदा खान ज्या नारेगाव भागातून पकडली गेली, तो परिसर नशेखोरांचा अड्डा बनला आहे. निदा खान ही केवळ एक मोहरा असून तिला कुणाचे तरी मोठे पाठबळ मिळत आहे. मुंब्रा आणि पुणे यांसारख्या शहरांतून विशिष्ट प्रवृत्तींना खतपाणी घालून समाजात धर्मांधता पसरवण्याचे षडयंत्र आखले जात आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर टीका करताना शिरसाठ म्हणाले की, निदा खान नाशिकवरून थेट संभाजीनगरला कशी पोहोचली आणि तिला कोणाची मदत मिळाली, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. निदा खान गर्भवती असल्याची अफवा पसरवून तिला सहानुभूती मिळवून देण्याचा प्रयत्न झाला, जो पूर्णपणे खोटा ठरला. या प्रकरणात एमआयएमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका संशयास्पद असून पोलीस आयुक्तांनी अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या कामकाजावर बोलताना शिरसाठ यांनी भाजप-शिवसेना युतीने एकत्र येऊन जनतेचे प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. तसेच रोहित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना, विरोधकांचे काम टीका करणेच असते आणि प्रत्येक पक्षाला आपली व्याप्ती वाढवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ