Eknath Shinde : धुळीच्या वादळामुळे एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरची तातडीची लँडिंग !

spot_img

मुंबईत अचानक निर्माण झालेल्या धुळीच्या वादळाचा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर प्रवासाला बसल्याची घटना समोर आली आहे. मुरबाडकडे रवाना झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग करावी लागली. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणालाही इजा झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास शिंदे हे मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅडवरून मुरबाडच्या दिशेने निघाले होते. एका पक्ष पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी ते प्रवास करत होते. मात्र ऐरोली परिसरात पोहोचताच हवामान अचानक बदलले आणि हेलिकॉप्टर धुळीच्या तीव्र वादळात सापडले.

स्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पायलटने तातडीने निर्णय घेतला. पुढील प्रवास सुरक्षित नसल्याचे सांगत हेलिकॉप्टर मागे वळवण्यात आले. त्यानंतर जुहू येथील वन हंस विमानतळाव येथे हेलिकॉप्टरची सुरक्षित लँडिंग करण्यात आली.

घटनेनंतर एकनाथ शिंदे सुरक्षितपणे ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी परतल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ