Sahar Shaikh : निवडणुकीत ‘फेक’ डॉक्युमेंट्स? AIMIM च्या सहर शेख यांचा आरोपांवर पलटवार!

spot_img

“मी फरार नाही, जमिनीवर काम करतेय”; राजकीय बदनामीविरोधात कायदेशीर लढाईचा इशारा

ठाणे महानगरपालिकेच्या राजकारणात आपल्या आक्रमक विधानांनी खळबळ उडवून देणाऱ्या AIMIM च्या नगरसेविका सहर शेख सध्या गंभीर वादाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. वॉर्ड क्रमांक ३० मधून निवडणूक जिंकलेल्या सहर शेख यांच्यावर निवडणुकीदरम्यान खोटी कागदपत्रे सादर केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, यावरून ठाणे तहसीलदार कार्यालयाने गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. मात्र, या सर्व प्रकरणावर सहर शेख यांनी आपले मौन सोडले असून, हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित आणि आपल्याला बदनाम करण्यासाठी रचलेले ‘कारस्थान’ असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये ‘नॉट रिचेबल’ आणि ‘फरार’ अशा बातम्या चालवल्या जात असल्याने सहर शेख यांनी संताप व्यक्त केला. “मी पळून गेलेली नाही, तर कायदेशीर प्रक्रिया समजून घेण्यासाठी काही काळ माध्यमांपासून लांब होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. ठाणे तहसीलदारांच्या चौकशीत सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी सादर केलेले २०११ मधील ओबीसी प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचे आढळले आहे. या प्रमाणपत्रावर अनिवार्य स्वाक्षऱ्या नसणे आणि ते अधिकृत प्रारुपाप्रमाणे नसल्याचे समोर आले आहे. या तांत्रिक मुद्द्यांवरून विरोधकांनी रान उठवले असले, तरी सहर शेख यांनी आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले आहे. आपली प्रतिमा मलिन करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून, प्रत्येक आरोपाचा हिशोब कोर्टात घेतला जाईल, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ