Riyan Parag Captured Vaping : कर्णधार रियान पराग ‘ड्रेसिंग रूम’मधील त्या कृत्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

spot_img

पंजाब किंग्सविरुद्धच्या थरारानंतर ‘व्हॅपिंग’चा व्हिडिओ व्हायरल; बीसीसीआय आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कठोर कारवाईचे संकेत

आयपीएल २०२६ च्या मैदानात राजस्थान रॉयल्सने (RR) पंजाब किंग्सविरुद्ध २२३ धावांचे महाकाय आव्हान पेलून ऐतिहासिक विजय मिळवला खरा, पण या विजयाच्या आनंदावर कर्णधार रियान परागच्या एका व्हायरल व्हिडिओने विरजण घातले आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात राजस्थानचा संघ धावांचा पाठलाग करत असताना, ड्रेसिंग रूममध्ये बसलेला रियान चक्क ई-सिगरेट (Vape) ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी वैभव सूर्यवंशीसारखे १५ वर्षांचे तरुण खेळाडू उपस्थित आहेत, तिथे कर्णधारानेच अशा प्रकारे वागल्याने क्रीडा विश्वातून संताप व्यक्त होत आहे.

रियान परागचे हे कृत्य आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन मानले जात असून, यामुळे खेळाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवला जाऊ शकतो. याप्रकरणी बीसीसीआय रियानला केवळ ताकीद देऊन थांबणार नाही, तर त्याच्या मॅच फीमध्ये कपात किंवा निलंबनाची कारवाई करण्याचीही दाट शक्यता आहे. राजस्थान रॉयल्ससाठी हा या मोसमातील दुसरा मोठा शिस्तभंगाचा प्रकार आहे; यापूर्वी संघ व्यवस्थापक रोमी भिंदर डगआऊटमध्ये मोबाईल वापरताना आढळले होते. आता कर्णधारानेच नियम धाब्यावर बसवल्याने, राजस्थान रॉयल्सच्या एकूण व्यवस्थापनावर आणि शिस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ