Vaibhav Sooryavanshi : ६ धावांनी हुकलं जागतिक रेकॉर्ड; १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची श्रीलंकेविरुद्ध धडाकेबाज खेळी!

spot_img

११ चेंडूंत सर्वात वेगवान अर्धशतकाचा रचला विश्वविक्रम; २९ चेंडूंत ९४ धावा कुटून एबी डिव्हिलियर्सचा रेकॉर्ड थोडक्यात वाचवला

श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात भारतीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने आपल्या फलंदाजीने इतिहास रचला आहे. अवघ्या १५ वर्षांच्या या खेळाडूने मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत केवळ ११ चेंडूंमध्ये लिस्ट ‘अ’ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा जागतिक विक्रम केला. मात्र, दुर्दैवाने २९ चेंडूंमध्ये ९४ धावांची वादळी खेळी केल्यानंतर वैभव बाद झाला. शतकापासून अवघ्या ६ धावा दूर असताना डावखुरा फलंदाज वैभव मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला आणि अवघ्या एका फटक्यामुळे त्याचे लिस्ट ‘अ’ मधील सर्वात जलद शतक हुकले.

वैभवने जवळपास ४०० च्या स्ट्राइक रेटने खेळताना १० चौकार आणि ८ उत्तुंग षटकार खेचले. जर या २९ व्या चेंडूवर त्याने षटकार मारला असता, तर जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या २९ चेंडूंतील आणि एबी डिव्हिलियर्सच्या ३१ चेंडूंतील सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम मोडीत निघाला असता. नवव्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार सहन अराचिगेच्या फिरकीवर मिड-ऑफवरून मारण्याच्या प्रयत्नात चेंडू थेट विजयकांत व्यासकांतच्या हातात विसावला. मागील सामन्यात श्रीलंकन खेळाडूंसोबत झालेल्या वादाला वैभवने आपल्या बॅटने चोख उत्तर दिले असून, त्याच्या या निर्भिड खेळीने इंडिया ‘अ’ संघाला अंतिम सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचवले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ