Raj Thackeray : NEET परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज-उद्धव ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल; ‘पदाची जबाबदारी घेता, मग अपयशाचीही घ्या!’

spot_img

‘शिवतीर्थ’वरील संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंची केंद्र सरकारवर जोरदार टीका; शांततामय आंदोलन चिरडण्याचा आणि सत्तेचा उद्दामपणा दाखवण्याचा गंभीर आरोप.

सध्या देशात गाजत असलेल्या NEET परीक्षेतील अनागोंदी कारभार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत. या संपूर्ण प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत ‘शिवतीर्थ’ येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केंद्राकडून दबाव आणून ते बळाने चिरडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी यावेळी केला. तसेच, “जेव्हा तुम्ही एखाद्या पदाची जबाबदारी स्वीकारता, तेव्हा त्या पदावर असताना आलेल्या अपयशाची नैतिक जबाबदारीही तुम्हीच घेतली पाहिजे,” असे स्पष्ट करत त्यांनी भूतकाळातील आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्यांचे आणि इतर आंदोलनांचे दाखले दिले. हे प्रकरण आता केवळ मंत्र्यांच्या राजीनाम्यापुरतं मर्यादित नसून थेट पंतप्रधान कार्यालय आणि गृहखात्यापर्यंत पोहोचल्याचे सांगत, पंतप्रधानांच्या केवळ ट्विटरवरील पोस्टला अर्थ नसून त्यांनी मुलांना थेट बोलवून चर्चा करायला हवी होती, असा सणसणीत टोला त्यांनी सत्तेच्या उद्दामपणावर लगावला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ