Putin Xi Jinping meeting 2026 : होर्मुजच्या संकटामध्ये रशियाचा मास्टरस्ट्रोक! पुतिन यांच्या एका निर्णयाने अमेरिकेची झोप उडाली

spot_img

आखाती देशांमधील युद्धाचा फायदा उठवत रशिया-चीनमध्ये ऐतिहासिक ऊर्जा करार; भारतालाही मिळणार मोठा दिलासा

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या जागतिक राजकारणात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. विशेषतः जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘होर्मुजची खाडी’ (Strait of Hormuz) बंद झाल्यामुळे संपूर्ण जगात एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या सागरी कोंडीमुळे चीनची ऊर्जा कोंडी झाली असतानाच, रशियाने एक मोठा ‘मास्टर गेम’ खेळला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या परिस्थितीचा अचूक फायदा घेत जागतिक राजकारणाची संपूर्ण समीकरणेच बदलून टाकली आहेत, ज्यामुळे अमेरिकेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सागरी मार्ग बंद झाल्यामुळे चीनसमोर ऊर्जेचा सुरक्षित पर्याय निवडण्याचे मोठे आव्हान होते. हेच हेरून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन एक महत्त्वाकांक्षी मेगा प्लॅन घेऊन थेट चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत ‘पॉवर ऑफ सायबेरिया २’ (Power of Siberia 2) या महत्त्वाकांक्षी गॅस पाईपलाईन प्रकल्पावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ही पाईपलाईन रशियाच्या सायबेरियातून मंगोलियामार्गे थेट चीनपर्यंत गॅस पोहोचवणार आहे.

**चीनला बंपर ऑफर: सागरी मार्ग रोखले गेल्याने चीनने या रखडलेल्या प्रकल्पाच्या वाटाघाटींना वेग दिला आहे. विशेष म्हणजे, रशिया या करारांतर्गत चीनला तब्बल ३३ टक्के स्वस्त दरात गॅस विकणार आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत गॅसच्या किमतींवर अंतिम स्वाक्षरी करून या पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे रशियाचे उद्दिष्ट आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ