Pune Crime : जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचा अपघाती मृत्यू

spot_img

हायवा आणि कारची जोरदार धडक होऊन,झालेल्या अपघातात जुन्नर तहसीलचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी वय ५२ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात शनिवारी दि.२५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जुन्नर बनकरफाटा रोडवर झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,शनिवारी जुन्नर-बनकर फाटा रोडवर हायवा क्र. एम एच १४ केयू ०८१२ हा जुन्नरहून बनकर फाट्याकडे येत असताना, बनकर फाट्याकडून जुन्नर कडे जाणारी होंडा सीटी कार एमएच १२ एफएफ ६४२३ ची दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारा पांगरी माथा ते गणपती फाटा दरम्यान या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी वय ५२, विजय खारतोडे वय ४८ हे गंभीर जखमी झाले असून, तुषार भीमराव कोरडे वय ३५, सर्व रा.जुन्नर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींवर ओतूर येथील एका खासगी रूग्णालयात प्राथमिक उपचार केले.दरम्यान या अपघातात  अनंता गवारी आणि विजय खारतोडे यांना गंभीर दुखापत झाल्याने,त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते.दरम्यान नायब तहसीलदार अनंता गवारी यांचे वाटेतच निधन झाले.तर विजय खारतोडे यांच्यावर पुणे येथील रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान खारतोडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी दिली.

अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलिस हवालदार नामदेव बांबळे, किशोर बर्डे, ट्रॅफिक वार्डन शुभम काशीद व अमोल मडके यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ