Preity Zinta : “महिला कुणाची मालमत्ता नसतात!” प्रिती झिंटाने ‘ट्रॉफी’ म्हणणाऱ्या युजरला झापले

spot_img

आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सची गुणतालिकेत ऐतिहासिक झेप

बॉलीवूडची ‘डिंपल गर्ल’ आणि पंजाब किंग्सची मालकीण प्रिती झिंटा सध्या आपल्या संघाच्या दमदार कामगिरीमुळे आणि एका सडेतोड उत्तरामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सने विजयाचा धडाका लावला असतानाच, प्रितीने आपल्या ‘बिनधास्त’ स्वभावाचा परिचय करून दिला आहे. एक्स (ट्विटर) वरील एका प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान एका चाहत्याने प्रितीला “तू स्वतःच एक ट्रॉफी आहेस,” असे म्हणत तिचे कौतुक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रितीला ही तुलना अजिबात आवडली नाही आणि तिने त्या युजरला अतिशय सभ्य पण तितक्याच प्रभावी शब्दांत आरसा दाखवला आहे.

प्रितीने युजरच्या या टिप्पणीवर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “धन्यवाद, तुमची भावना जरी प्रेमळ असली तरी खरं सांगायचं तर कोणत्याच महिलेला ‘ट्रॉफी’ बनायची इच्छा नसते. ट्रॉफी या जिंकल्या जातात आणि त्या शोकेसमध्ये ठेवण्याची वस्तू असतात, परंतु महिला कुणाची वैयक्तिक संपत्ती नसतात. एका महिलेची जागा तुमच्या आयुष्यात आणि हृदयात असते.” प्रितीच्या या उत्तराने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले असून, महिलांचा स्वाभिमान जपल्याबद्दल तिचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे. एका फिल्मी कमेंटला आपण फिल्मी स्टाईलनेच उत्तर दिल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले.

दुसरीकडे, मैदानावर पंजाब किंग्सचा संघ ‘श्रेयस अय्यर’च्या नेतृत्वाखाली इतिहास रचत आहे. श्रेयसच्या कर्णधारपदाचे कौतुक करताना प्रितीने त्याला एक ‘प्रेरणादायी लीडर’ म्हटले आहे. मजेशीर बाब म्हणजे, आपली मुले त्याला ‘श्रेयस भैय्या’ म्हणून हाक मारतात, असा गौप्यस्फोटही तिने केला. श्रेयस अय्यरने ७ सामन्यांत १३ गुणांसह पंजाबला गुणतालिकेत अव्वल स्थानी नेऊन ठेवले आहे. नुकत्याच दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात २६५ धावांचे महाकाय लक्ष्य साध्य करताना श्रेयसने केवळ ३६ चेंडूत ७६ धावांची वादळी खेळी केली होती. रिकी पाँटिंगचे मार्गदर्शन आणि श्रेयसचे नेतृत्व यामुळे पंजाब किंग्स आयपीएलच्या इतिहासात पहिल्या सात सामन्यांत १२ पेक्षा जास्त गुण मिळवणारी पहिली टीम ठरली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ