Police Exam : पुन्हा ‘या’ दिवशी होणार पोलीस भरतीची परीक्षा; वादानंतर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

spot_img

पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील वादग्रस्त ठरलेली लेखी परीक्षा आता 24 मे रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेबाबत गंभीर आक्षेप घेतले गेले होते. अनेक प्रश्न हे विविध प्रश्नसंचांमधून थेट उचलल्याचा आरोप उमेदवार आणि संघटनांकडून करण्यात आला होता. विशेषतः एका खासगी प्रकाशनाच्या प्रश्नसंचातील मोठ्या प्रमाणातील प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत आल्याने परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली होती.

वाद अधिक तीव्र झाल्यानंतर प्रशासनाने अखेर संबंधित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता नव्याने पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले असून 24 मे रोजी उमेदवारांची पुन्हा लेखी परीक्षा होणार आहे. या निर्णयामुळे भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या अनेक उमेदवारांनी समाधान व्यक्त केले असून, यावेळी परीक्षा निष्पक्ष आणि सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ