Parth Pawar : पार्थ पवारांचा ‘त्या’ वादग्रस्त विमानातून प्रवास

spot_img

अजितदादांच्या अपघातानंतर ज्या कंपनीवर घातपाताचा आरोप झाला, त्याच VSR च्या विमानात पार्थ पवार दिसल्याने खळबळ

महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर ज्या VSR Aviation कंपनीवर टीकेची झोड उठली होती, त्याच कंपनीच्या विमानातून खासदार पार्थ पवार यांनी प्रवास केल्याने एकच खळबळ उडाली. आमदार रोहित पवार यांनी या अपघाताला ‘घातपात’ म्हणत ज्या कंपनीचे वाभाडे काढले होते, त्याच विमानात पार्थ पवार दिसल्याने विरोधकांनी टीकेची झोप उडवली. मात्र, या सर्व प्रकारावर पार्थ पवार यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे.

पार्थ पवारांनी स्पष्ट केले की, पुण्यात शरद पवार साहेबांना भेटण्यासाठी त्यांना तातडीने पोहोचायचे होते. कार्यालयाने शेवटच्या क्षणी केलेल्या घाईघाईच्या नियोजनामुळे हे विमान बुक झाले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आपल्याला ते विमान VSR Aviation चे आहे, याची पुसटशी कल्पनाही नव्हती, असे त्यांनी नमूद केले. ही केवळ एक प्रशासकीय चूक असून, या प्रकरणी संबंधित ट्रॅव्हल एजंटचा करार तात्काळ रद्द करण्यात आला आहे. “आमची भूमिका आजही स्पष्ट आहे, त्या कंपनीला आमचा विरोध कायम राहील. यावरून राजकारण करणे दुर्दैवी आहे,” अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ