NEET 2026 : पेपर फुटल्याने नीट 2026 परीक्षा रद्द; लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

spot_img

वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET 2026 परीक्षा रद्द करण्यात आल्याची मोठी घडामोड समोर आली आहे. ३ मे रोजी देशभरात पार पडलेल्या या परीक्षेनंतर पेपरफुटीचे गंभीर आरोप समोर आल्यानंतर केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास कायम राखण्यासाठी अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने जारी केलेल्या निवेदनानुसार, ८ मे रोजी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय यंत्रणांकडे सोपवण्यात आली होती. प्राथमिक तपासात काही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर सध्याची परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह राहू शकत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एनटीएने सांगितले आहे.

दरम्यान, राजस्थानमध्ये नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप सर्वप्रथम समोर आले होते. काही संशयित हालचाली आणि कथित नेटवर्क उघड झाल्यानंतर Central Bureau of Investigation अर्थात CBI ने तपास सुरू केला आहे. पेपर नेमका कुठून आणि कशा प्रकारे बाहेर गेला, यामागे कोणते रॅकेट कार्यरत होते आणि किती लोक या प्रकरणात सहभागी होते, याचा सखोल तपास केला जाणार आहे.

या निर्णयाचा थेट परिणाम जवळपास १० लाख विद्यार्थ्यांवर होणार असून, त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र नव्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले असून, तपासासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे आणि माहिती सीबीआयला देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ