MI Playing 11 : MI चा ‘करो या मरो’चा सामना हार्दिक-सूर्याविना मुंबईचे गणित बिघडणार?

spot_img

पुढील सर्व सामने जिंकण्याचे आव्हान; रायपूरमध्ये रंगणार आरसीबीविरुद्ध हाय-व्होल्टेज लढत

मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२६ मधील प्रवास आता एका अशा वळणावर आला आहे, जिथे एक छोटीशी चूकही त्यांना स्पर्धेतून बाहेर करू शकते. सलग पराभवांच्या धक्क्यानंतर लखनौविरुद्ध मिळवलेला विजय मुंबईसाठी संजीवनी ठरला असला, तरी १० मे रोजी रायपूरमध्ये होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघात चिंतेचे वातावरण आहे.

हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. गेल्या सामन्यात पाठदुखीमुळे (Back Spasm) खेळू न शकलेला कर्णधार हार्दिक पंड्या अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही. तो संघासोबत रायपूरला रवाना झाला नसल्याने चाहत्यांच्या काळजीत भर पडली आहे. मिस्टर ३६० ‘सूर्या’ लवकरच बाबा होणार असल्याची चर्चा मीडिया रिपोर्ट्समध्ये आहे. याच वैयक्तिक कारणास्तव तो आरसीबीविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात उपलब्ध नसेल, असे संकेत मिळत आहेत.

हार्दिक आणि सूर्या या दोघांच्या अनुपस्थितीत संघाची धुरा कोणाकडे असेल, हा मोठा प्रश्न आहे. लखनौविरुद्ध रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा यांच्यातील १४३ धावांच्या विक्रमी भागीदारीने मुंबईला तारले होते. आता पुन्हा एकदा ‘हिटमॅन’ रोहित शर्मानेच संघाचे नेतृत्व करावे, अशी मागणी होत आहे. रोहितशिवाय युवा तिलक वर्मा हा देखील नेतृत्वासाठी एक सक्षम पर्याय मानला जात आहे.

मुंबईची संभाव्य ‘प्लेईंग इलेव्हन’
संघातील बदलांमुळे आणि परदेशी खेळाडूंच्या मर्यादेमुळे (कमाल ४) मुंबईचे व्यवस्थापन नव्या रणनीतीसह मैदानात उतरू शकते:

रोहित शर्मा, विल जॅक्स, जसप्रीत बुमराह, रायन रिकेल्टन, नमन धीर, दीपक चहर, क्विंटन डी कॉक , एम गझनफर, तिलक वर्मा, रघु शर्मा ,रॉबिन मिन्झ, शार्दुल ठाकूर

क्विंटन डी कॉकने पंजाबविरुद्ध केलेल्या शतकानंतर त्याला संघात पुन्हा स्थान मिळाल्यास फलंदाजीचा क्रम बदलू शकतो. तसेच, गोलंदाजीमध्ये धार आणण्यासाठी दीपक चहर आणि बुमराहवर मोठी जबाबदारी असेल. मुंबईला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पुढील चारही सामने जिंकणे अनिवार्य आहे. आरसीबीविरुद्धचा हा सामना मुंबईच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ