Matka King : ‘मटका किंग’मध्ये नागराज मंजुळेंकडून झाली मोठी चूक? नेटकऱ्याने पुराव्यासह दाखवली सिद्धार्थ जाधवच्या सीनमधील गल्लत!

spot_img

दगडू विचारेच्या एन्ट्री सीनमध्ये तांत्रिक चूक असल्याचे सोशल मीडियावर उघड; दिग्दर्शन आणि एडिटिंगवर उपस्थित झाले प्रश्नचिन्ह

नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखालील ‘मटका किंग’ ही वेब सीरिज सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. विजय वर्माचा दमदार अभिनय आणि सई ताम्हणकर-सिद्धार्थ जाधव यांसारख्या मराठी कलाकारांच्या उपस्थितीमुळे ही सीरिज चर्चेत आहे. मात्र, याच सीरिजमधील एका मोठ्या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एका जागरूक नेटकऱ्याने या सीरिजमधील ‘कंटिन्युटी’ची चूक अचूक पकडली असून, त्याचा संबंध सिद्धार्थ जाधवने साकारलेल्या ‘दगडू विचारे’ या पात्राशी आहे. एकाच सीनच्या वेगवेगळ्या फ्रेममध्ये सिद्धार्थच्या चालण्यातील तफावत पाहून चाहते अवाक झाले आहेत.

तक्रार केलेल्या नेटकऱ्याच्या मते, सुरुवातीच्या सीनमध्ये जेव्हा सिद्धार्थ जाधवचे पात्र (दगडू) पहिल्यांदा पडद्यावर येते, तेव्हा तो एका पायाने अधू असल्याचे दाखवले आहे. तो स्पष्टपणे लंगडत चालताना दिसतो. मात्र, काही क्षणातच पुढील एका शॉटमध्ये तोच दगडू कोणत्याही मदतीशिवाय अगदी सर्वसामान्य माणसाप्रमाणे चालताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नागराज मंजुळे यांच्यासारख्या अभ्यासू दिग्दर्शकाच्या कामात आणि एडिटिंग टेबलवर ही चूक कशी काय निसटली, असा सवाल आता विचारला जात आहे. या चुकीवर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी, सिद्धार्थ जाधवने साकारलेल्या पहिल्या वेब सीरिजमधील त्याच्या भूमिकेचे आणि त्याने घेतलेल्या मेहनतीचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ