Marathi Actor : अभिनेता निखिल राजेशिर्के लवकरच होणार बाबा,चाहत्यांना दिली गूडन्यूज

spot_img

मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत सध्या आनंदाचे वातावरण असून कलाकारांच्या आयुष्यात गोड बातम्यांचा वर्षाव होताना दिसत आहे. ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता रोहन गुजर नुकताच जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. त्याची पत्नी स्नेहल देशमुखने दोन गोंडस बाळांना जन्म दिल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बातमीने चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या आनंदवार्तेनंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याच्या घरी लवकरच पाळणा हलणार असल्याची गोड बातमी समोर आली आहे. ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून ओळख मिळवलेला अभिनेता निखिल राजेशर्के लवकरच वडील होणार आहे. त्याची पत्नी चैत्राली गरोदर असून, ही आनंदाची बातमी निखिलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.

निखिल आणि चैत्राली यांच्या लग्नाला साधारण दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. लग्नानंतर आता त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याने दोघेही प्रचंड उत्सुक आहेत. या खास क्षणाचे सेलिब्रेशन म्हणून त्यांनी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा केला. यावेळी काढलेले सुंदर फोटो निखिलने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये चैत्रालीने फिकट हिरव्या रंगाची साडी परिधान केली असून, त्यावर तिने फुलांचे दागिने घालून पारंपरिक आणि आकर्षक लूक साकारला आहे. तिचा साधा मेकअप आणि तेजस्वी हास्य तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. दुसरीकडे, निखिलने क्रीम आणि सोनेरी रंगाची शेरवानी परिधान करत पारंपरिक लूक पूर्ण केला आहे. या गोड बातमीवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लवकरच त्यांच्या आयुष्यात नव्या आनंदाचा अध्याय सुरू होणार असल्याने त्यांच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ